महानगरपालिकेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
महानगरपालिकेच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन
औरंगाबाद,दि.14(डि-24 न्यूज) महामानव भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आज महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
सकाळी भडकल गेट येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे, शहर अभियंता ए बी देशमुख,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पारस मंडलेचा, मुख्य उद्यान अधीक्षक विजय पाटील,कार्यकारी अभियंता बी डी फड,सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू,सहायक आयुक्त संजय सुरडकर,माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद,लेखा अधिकारी संजय कोलते,कर्मचारी यांची उपस्थिती होती.
यांनतर मान्यवरांच्या हस्ते महानगरपालिकेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
What's Your Reaction?