महापालिकेच्या वर्धापनदिन दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या आंतरशालेय कॅरम स्पर्धा थाटात
महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या आंतरशालेय कॅरम स्पर्धेला प्रियदर्शनी शाळेत थाटात सुरुवात...
औरंगाबाद, दि.2(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिका शाळांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
मनपा आयुक्त . जी . श्रीकांत यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला खेळू द्या या उपक्रमांतर्गत यावर्षी वर्धापन दिनाच्या निमित्ताने महानगरपालिका शाळांमधून विविध स्पर्धा घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे .या स्पर्धांपैकी कॅरम या स्पर्धेचे उद्घाटन महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी या शाळेत करण्यात आले.
या उद्घाटनाच्या कार्यक्रमप्रसंगी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या आंतरशालेय स्पर्धाला प्रियदर्शनी शाळेत थाटात सुरुवात झाली.
महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिका शाळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.या उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ,सौरभ जोशी अतिरिक्त आयुक्त ,संजीव सोनार मुख्याध्यापक ,संजीव बालय्या क्रीडा अधिकारी ,शशिकांत उबाळे मुख्याध्यापक, रईसा मॅडम, हे उपस्थित होते .
महानगरपालिका शाळांमधून मोठ्या प्रमाणात या विविध स्पर्धांना विद्यार्थी हजेरी लावत आहेत.
आज उद्घाटन पर भाषणात
सौरभ जोशी अतिरिक्त आयुक्त यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच खेळाडू वृत्ती देखील जोपासली पाहिजे. प्रत्येकाने विजयश्री खेचून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
जर पराभव झाला तर तो देखील खिलाडू रीतीने पचवला देखील गेला पाहिजे असे उद्गार काढले.
अतिशय चांगल्या वातावरणात ही स्पर्धा प्रियदर्शनी शाळेच्या सभागृहात सुरू आहेत.
याकरिता क्रीडा अधिकारी त्यांची टीम व शाळेचे शिक्षक मेहनत घेत आहेत. सौरभ जोशी अतिरिक्त आयुक्त ,संजीव सोनार मुख्याध्यापक ,संजीव बालय्या क्रीडा अधिकारी ,शशिकांत उबाळे मुख्याध्यापक हे उपस्थित होते .महानगरपालिका शाळांमधून मोठ्या प्रमाणात या विविध स्पर्धांना विद्यार्थी हजेरी लावत आहेत.अतिशय चांगल्या वातावरणात ही स्पर्धा प्रियदर्शनी शाळेत सुरू आहे.
याकरिता क्रीडा अधिकारी त्यांची टीम व शाळेचे शिक्षक मेहनत घेत आहेत.
What's Your Reaction?