महायुतीच्या प्रचारात मराठमोळ्या वेशभूषेत महीलांनी केला अतुल सावे यांचे स्वागत

महायुतीच्या प्रचारात मराठमोळ्या वेशभूषेत महिलांनी केले अतुल सावे यांचे स्वागत
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज) आगामी विधानसभा निवडणुकांसाठी छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय (आ) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्री अतुल मोरेश्वर सावे यांच्या प्रचारार्थ बुधवारी सायंकाळी वार्ड क्रमांक 40 गणेश नगर येथे भव्य प्रचार पदयात्रा काढण्यात आली. मराठमोळ्या वेशभूषेत सजलेल्या महिला मतदारांनी या पदयात्रेत अतुल सावे यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. महिला पारंपरिक नऊवारी साड्या, पगडी आणि फेटा परिधान करून या सोहळ्याची शोभा वाढवत होत्या, ज्यामुळे मराठी संस्कृतीचा ठसा उमटला.
पदयात्रेदरम्यान "विकासाला हवे, अतुल सावे!" या घोषणांनी परिसर दुमदुमला. श्री सावे यांनी मतदारांशी संवाद साधताना, सिडको परिसरातील लीजहोल्ड ची घरे फ्रीहोल्ड करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. ज्यामुळे २१ हजार घरमालकांना त्याचा लाभ होणार आहे. तसेच येथील रस्ते, ड्रेनेज, आरोग्य आणि स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगत उद्योगासाठी देखील प्रयत्न केले असल्याचे सांगितले.
मतदारांच्या हितासाठी केलेल्या या कामांमुळे विकासाच्या दिशेने महायुती कटिबद्ध असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. २० तारखेला मतदान करून कमळ चिन्हावर शिक्का मारून महायुतीचे उमेदवार श्री अतुल सावे यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.
या प्रसंगी अभिजीत देशमुख, शिवाजी दांडगे, कवर सिंग बैनाडे, अशोक वीरकर, नितीन चित्ते, रेखा जैस्वाल, अमय देशमुख , प्रशांत नांदेडकर, चेतन वडगावकर, सागर वडगावकर, विजय सरोदे, श्रीरंग जोशी, नितीन खरात, श्रीनिवास देव, गणेश तेलोरे, अरविंद कामठीकर, किशोर शेळके, महेश राऊत, आकाश राऊत, शुभम पवार, मनोज पवार, अनिल बर्डे, जयराज भसंडे, कमलेश तिळवे,सरिता घोडतुरे, योगेश भाकरे, अरुण पालवे, नितीन राऊत, स्वप्नील देवकर, मनोज जोशी, वर्षा साळुंखे, लक्ष्मी गायकवाड, अरविंद डोणगावकर, विक्रम पवार, यांच्या यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नागरिक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
What's Your Reaction?






