महाविर किराणाला आग, अग्निशमन दलाचे बंब दाखल

महाविर किराणाला आग, अग्निशमन दलाचे बंब दाखल
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज) हि आत्ताची बातमी आहे. गजबजलेल्या शहागंज, चेलिपूरा येथील प्रसिद्ध महाविर किराणा शाॅपीला आग लागली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले व रहदारी रोखली. अग्निशमन दलाचे पाण्याचे बंब आग विझवण्यासाठी दाखल झाले आहेत. आगीचे लोन बाजूच्या दुकानाकडे पसरु नये यासाठी आजूबाजूचे लोक आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहे. रहदारीचा रस्ता बंद करण्यात आला आहे. आगीत लाखोंचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. आगीचे कारण अद्याप अजून समजले नाही.
आग वाढत असल्याची माहिती मिळत आहे. आजूबाजूच्या दुकानात आग पसरली असल्याने घटनास्थळी मनपा आयुक्त जी श्रीकांत, मंत्री अतुल सावे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाचे पाच ते सात बंब आग आटोक्यात आणण्यासाठी आले आहे. मोठा जमाव येथे जमला आहे. विज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. अंधारात आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला आहे. शहागंज व चेलिपुरा परिसरातील लोक जागे झाले आहे.
What's Your Reaction?






