मोदी, शरद पवार, उध्दव ठाकरे यांच्यावर खा.इम्तियाज जलिल यांचा घणाघात
मोदी, शरद पवार, उध्दव ठाकरे यांच्यावर खा.इम्तियाज जलिल यांचा घणाघात
शांततेचे केले आवाहन...
औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) देशाला मराठा आंदोलकांनी लाखोंच्या संख्येने मोर्चे काढून आदर्श निर्माण केला त्यावेळी कोणत्याही शहरात अनुचित प्रकार झाला नाही. पण एका छोट्याशा गावात एक मराठा आंदोलक मराठा आरक्षणाची लोकशाही मार्गाने आंदोलन करत असेल तर त्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. मोदी, शरद पवार, उध्दव ठाकरे यांच्यावर नाव न घेता खासदार इम्तियाज जलिल यांनी घणाघात केला.
सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नेते अंतरवाली सराटी येथे आंदोलकांशी भेट घेवून मराठा समाजाला उल्लू बनवत असल्याचा आरोप केला. शरद पवार व उध्दव ठाकरे यांची सत्ता असताना त्यांनी आरक्षण दिले नाही. सध्याचे सत्ताधारी भाजपा त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत होते. जे नेते आंदोलकाशी भेट घेण्यासाठी येत आहे नाटक असल्याचा आरोप जलिल यांनी केला. देशात सध्या हुकुमशाही असल्याचा आरोप करत मोदींवर जलिल यांनी टिका केली. कोणी हक्काची मागणी करत असेल तर ती यांना मान्य नसल्याने अशा प्रकारचे लाठीहल्ले करुन तोंड दाबले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मी आमदार असताना मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. मराठा समाजात अनेक लोक गरीब आहे त्यांना आरक्षण मिळावे. या आरक्षणाच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. या घटनेचा मी निषेध करतो. मराठा समाजाने शांतता राखावी. लोकशाही मार्गाने आपल्या हक्काच्या मागणीसाठी आंदोलन करावे असे शांततेचे आवाहन खासदार इम्तियाज जलिल यांनी केले आहे. आज रात्री साडेसात वाजता चिकलठाणा विमानतळावर त्यांचे आगमन झाले त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
What's Your Reaction?