यजमान संघाने जिंकला एम्प्लॉई-20 चषक, गरवारे स्टेडियमवर रंगला सामना
यजमान संघाने जिंकला एम्प्लॉई-20 चषक...
गरवारे मैदानावर रंगला क्रिकेट सामना...
एम्प्लॉई-20 टूर्नामेंट : मनपा संघाने कम्बाइंड बँकर्सला नमवले...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.27(डि-24 न्यूज)
जागतिक पातळीवर टी-२० वर्ल्ड कपचा थरार सुरू असताना छत्रपती संभाजीनगरात गरवारे स्टेडियमवर प्रकाश झोतात महापालिकेच्या वतीने एम्प्लॉई टी-२० क्रिकेट स्पर्धेचा ग्रँड अंतिम सामना रंगला .बुधवारी सायंकाळी दुसऱ्या सत्रात पार पडलेल्या सामन्यात महापालिकेच्या संघाने प्रशासक तथा कर्णधार जी. श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली कम्बाइंड बँकर्स संघाला 1 विकेटने मात देत विजय मिळवला.
छत्रपती संभाजीनगर पालिकेने प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच गरवारे क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी अद्यावत करून, मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे फ्लड लाइट्स बसवले आहेत. त्यामुळे हे मैदान डे-नाइट क्रिकेट मॅचेससाठी सज्ज झाले आहे. या मैदानावर बुधवारी रात्री पालिकेच्या वतीने एम्प्लॉई टी-२० क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. या सामन्यात पालिकेच्या संघाने प्रशासक तथा कर्णधार जी. श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या चित्त थरारक सामन्यात कम्बाइंड बँकर्स संघावर 1 विकेटने मात करून चषक आपल्या नावावर केला.
या स्पर्धेत पहिल्यांदा पालिका संघात महिला खेळाडू प्रियंका गारखेडने सहभाग नोंदवला. बॉलिंग करताना इनायत अली यांनी ०५ बळी टिपत नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या कम्बाइंड बँकर्सला १५३ धावांवर रोखले. धावांचा पाठलाग करताना पालिका संघातून राहुल जौनवार (७१), बासित अली (२८), जी. श्रीकांत (११), अमोल खरात (१०) यांनी जोरदार फलंदाजी करत कम्बाइंड बँकर्सने दिलेले १५४ धावांचे लक्ष्य १९.२ षटकांत गाठले. स्पर्धेअंती सामनावीर राहुल जौनवाल, उत्कृष्ट फलंदाज इनायत अली सईद, उत्कृष्ट गोलंदाज दादासाहेब कसारे, तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून मोहम्मद इमरान यांना गौरविण्यात आले. पालिकेचे क्रीडा अधिकारी संजीव बालय्या, तांत्रिक समिती अध्यक्ष सय्यद जमशीद, खेळाडू दीपक जावळे, मैदान देखभाल गुलाम मुस्तफा मोहमद सलीम यांनी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.
मैदानावर प्रशासकांसह अधिकाऱ्यांची धमाल...
या सामन्यात विजय मिळवल्यानंतर प्रशासक जी. श्रीकांत, मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांच्यासह पालिका अधिकारी व कर्मचारी गाण्याच्या तालावर थिरकले. सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेत नाचत नाचत चांगलीच धमाल केली. कर्मचाऱ्यांनी जी. श्रीकांत यांना खांद्यावर घेत एकच जल्लो
ष केला.
What's Your Reaction?