युवा फिजिकल एज्युकेशन मॅरेथॉन स्पर्धेस सुरुवात
युवा फिजिकल एज्युकेशन मॅरेथॉन स्पर्धेस सुरुवात
औरंगाबाद,दि.11(डि-24 न्यूज) युवा फिजिकल एज्युकेशन असोसिएशन यांच्या वतीने आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे करण्यात आले.
ही स्पर्धा 12 ,14आणि 17 वर्षे मुले आणि मुलींच्या गटात घेण्यात आली. या मॅरेथॉन स्पर्धेचा उद्देश "हर कदम शारीरिक शिक्षाकी और" असा होता.
दररोज किमान एक किलोमीटर धावण्याचा सराव केला पाहिजे, यातून शरीर निरोगी राहण्यास मदत होईल.
स्पर्धेचे उद्घाटन अमजद पठाण ,अब्दुल कय्युम , सय्यद अलीम व युवा फिजिकल असोसिएशनचे अध्यक्ष अस्लम शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
यात 35 शाळेतील 1700 खेळाडू सहभागी झाले होते.
विद्यापीठाच्या ॲथलेटिक्स मैदानासमोरुन स्पर्धेस प्रारंभ झाला. तर समारोप डॉ.बाबासाहेब पुतळ्याजवळील वाय कॉर्नर येथे झाला.
मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी मुख्तार सय्यद, प्रबोधन बनसोडे, सुमित ढगे, सुयश नाटकर, समीर शेख, अनिल पवार, रामेश्वर वैद्य, अविनाश कोकाटे , आशिष चेट्टी, अश्विनी वाघमारे, कोमल गेलोट, सय्यद निसार , राहुल परदेशी, ऋषभ मिश्रा, मुजीब सय्यद आदींनी परिश्रम घेतले.
What's Your Reaction?