राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार - महेश तपासे

 0
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार - महेश तपासे

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार - महेश तपासे

महायुतीचे घोटाळे बाहेर काढणार, विधानसभा निवडणुकीत 180 जागा निवडून येणार असल्याचा व्यक्त केला विश्वास...

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.1(डि-24 न्यूज) लोकसभा निवडणुकीत जो कौल महाराष्ट्रातील मतदारांनी दिलेला आहे अशा प्रकारे ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता आशिर्वाद देईल. लोकसभेचा निकाल बघितले तर महाविकास आघाडीला 160 जागेवर आघाडी मिळाली होती. परंतु महाविकास आघाडीची एकजूट बघता 180 जागा मिळतील. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण विचारणारे महायुतीच्या नेत्यांनी विरोधी पक्ष नेत्यांचा चेहरा कोण हे जाहीर करावे अशी टिका महायुतीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी प्रवक्ते सुरजित सिंग खुंगर, मुश्ताक अहमद, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, कार्याध्यक्ष अभिजित देशमुख,  एड लक्ष्मण प्रधान, विना खरे, एड यशवंत देशमुख, सय्यद तौफिक, गजाला जमादार, शाहीन पठाण, मोहम्मद ताहेर, अशरफ पठाण यांची उपस्थिती होती.

तपासे यांनी पुढे सांगितले आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना महायुती सोबत घेणार नाही. एकनाथ शिंदे व राज ठाकरे यांना सोबत घेऊ शकतात. आरएसएसच्या मुखपत्रातून अजित पवारांना भाजपाने सोबत घेतल्यावर लोकसभा निवडणुकीत फायदा झाला नाही अशी टीका केली होती. शरद पवार यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे की सोबत घेणार नाही मग येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांची गोची होणार असल्याचे तपासे यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड येथील नगरसेवक स्वगृही परतण्याच्या मार्गावर आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महायुतीचे घोटाळे बाहेर काढणार. राज्यावर 7 लाख 82 हजार कोटींचे कर्ज आहे. राज्यातील उद्योग बाहेर चालले आहे यामुळे दरडोई उत्पन्न कमी होत चालले आहे. यावर श्वेत पत्रिका काढण्याची मागणी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व देणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सत्तेवर आल्यास घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. औरंगाबाद येथील जमीन मोजणी प्रकरणात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. सिटी सर्व्हे विभागात जमीन मोजणीचे पैसे सरकारी तिजोरीत न भरता खर्च केले बोगस चालान बणवण्यात आले. या प्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी तपासे यांनी केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow