"राज-ए-इश्क" हिंदी चित्रपट पहील्याच दिवशी हाऊसफुल्ल... चित्रपट बघण्यासाठी चाहत्यांनी केली गर्दी...!

"राज-ए-इश्क" हिंदी चित्रपट पहील्याच दिवशी हाऊसफुल्ल... चित्रपट बघण्यासाठी चाहत्यांनी केली गर्दी...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज) स्थानिक कलाकार मुख्य भुमिकेत असलेले असलम खान "राज-ए-इश्क" हिंदी फुल स्क्रीन चित्रपट प्रिमियर शो दुपारी औरंगपुरा येथील अंबा अप्सरा चित्रपट गृहात प्रिमियर शो चे शानदार उद्घाटन मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उत्साहात व ढोल ताशांच्या गजरात संपन्न झाले. या शोच्या वेळी शहरातील मान्यवर व कलाकारांनी हजेरी लावली. मराठवाड्यातील 60 मोठ्या स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित झाला व पहिल्याच दिवशी हाऊसफुल्लचे बोर्ड चित्रपट गृहात लागल्याने चाहत्यांना स्थानिक कलाकारांची भुमिका आवडली असे दिसून आले. हिंदी चित्रपट चाहत्यांनी हा चित्रपट काॅलेज लाईफ, लव्ह स्टोरी, मारधाड व मनोरंजन करणारा आवडता चित्रपट असल्याचे सांगितले. स्थानिक कलाकारांनी ऐतिहासिक शहरात बाॅलिवूड चित्रपट बनवला गर्वाची गोष्ट आहे भविष्यात शहरात बीग बजेट चित्रपट बनवावा अशी भावना श्रोत्यांनी व्यक्त केली आहे. स्थानिक कलाकारांना असलम खान यांनी हिंदी चित्रपटात व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल आभार मानले.
याप्रसंगी जेष्ठ साहित्यिक व लेखक मधुकर अण्णा वैद्य, माजी नगरसेवक अफसरखान, निर्माता व अभिनेता असलम खान, मराठी नाट्य अभिनेते संजय बनसोडे, दिग्दर्शक रजिह आलम, असोशिएट दिग्दर्शक चंद्रशेखर, स्थानिक कलाकार गणेश घुसळे, कासम मेमन, सह कलाकार श्रीमती पाथ्रीकर आदींची उपस्थिती होती.
What's Your Reaction?






