राहुल गांधी यांच्या विरोधात अपशब्द, काँग्रेस रस्त्यावर, निदर्शने व केला रास्ता रोको
राहुल गांधी यांच्या विरोधात अपशब्द वापरणारे आमदार संजय गायकवाड, खासदार राहुल बोंडे यांच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन व रास्ता रोको
छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज)
सातत्याने देशाचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड, राज्यसभा खासदार राहुल बोंडे यांनी केलेल्या वक्त्याव्या विरोधात शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी संजय गायकवाड, अनिल बोंडे यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले व जिल्हाधिकारी कार्यालय समोर रास्ता रोको करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या नेत्यांकडून आपले नेते लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची हत्या करण्याच्या, त्यांची जीभ कापण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यासाठी बक्षीसे जाहीर केली जात आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्या जिविताला भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या नेत्यापासून धोका आहे हे स्पष्ट झाले आहे.
दिल्लीतील भाजपाचा नेता तरविंदरसिंह मारवा याने राहुल गांधीची अवस्था त्यांची आजी इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे करू अशी खुले आम धमकी दिली आहे.
भाजपाचा केंद्रीय मंत्री रवनित बिड्डू यांनी राहुल गांधी यांना दहशतवादी म्हटले आहे. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड याने राहुल गांधी यांची जीभ कापणा-यास ११ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. तर भाजपाचा राज्यसभा खासदार अनिल बोंडे याने राहुल गांधी यांच्या जिभेला चटके दिले पाहिजेत असे वक्तव्य केले आहे. भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या नेत्यांची ही वक्तव्ये अत्यंत गंभीर असून राहुलजींच्या जिविताला यांच्यापासून धोका आहे हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली आहे पण सरकार आणि भाजपाने अद्यापाही या धमक्या देणा-या नेत्यांवर कोणतीही कारवाई केली नाही.
त्यामुळे हे सर्व जाणिवपूर्वक सुरु आहे हे स्पष्ट झाले आहे. राहुलजी गांधी यांची आजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांची हत्या देशविघातक घटकांनी केली आहे. त्यामुळे या धमक्यांना गांभार्याने घेण्याची गरज आहे. राहुल गांधी सातत्याने संसदेत आणि देशभरात सामाजिक न्यायाचा आवाज बुलंद करत आहेत. जातिनिहाय जनगणना करण्याची व आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवून दलित, आदिवासी, ओबीसींची हिस्सेदारी वाढवण्याची मागणी केली आहे. या गोष्टींना ज्यांचा विरोध आहे ते लोक सातत्याने राहुल गांधी यांच्याबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्ये करण्याची, जीवे मारण्याच्या धमक्या देण्याची सुनियोजित मोहीम चालवत आहेत.
यावेळी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख युसूफ, विलास औताडे, जितेंद्र देहाडे, जगन्नाथ काळे, योगेश मसलगे, इब्राहिम पठाण, किरण पाटील डोणगावकर, भाऊसाहेब जगताप, मोहन देशमुख, दीपाली मिसाळ, सय्यद अक्रम, सागर नागरे अनिस पटेल, अरुण शिरसाठ, डॉ.सरताज पठाण, कांचनकुमार चाटे, इकबाल सिंग गिल, जयप्रकाश नन्नावरे, विश्वास औताडे, संजय धर्मरक्षक, अकेब रजवी, उमाकांत खोतकर, महेंद्र रमंडवाल, मोईन इनामदार, मसरूर खान, इंटकचे शहराध्यक्ष शेख अथर, राहुल सावंत, डॉ.पवन डोंगरे, शेख रईस, शेख कैसर बाबा, प्रशांत शिंदे, अनिता भंडारी, मोईन कुरेशी, हकीम पटेल, विनायक सरवदे मंजू लोखंडे, रवी लोखंडे, सीमा थोरात, प्रकाश सानप, सुभाष देवकर, सय्यद युनूस, मुदासिर अन्सारी, अजमत खान, अहिरे यादव, जुल्फीकार शेख प्रदीप त्रिभुवन, योगेश थोरात, बाबुराव कावसकर, इफतेकर इंजिनिअर, आबेद जहागीरदार, शेख अब्बास, सय्यद फायाजुद्दीन, शेख फाहात प्रदीप त्रिभुवन, जफर शेख, जावेद पठाण विद्या घोरपडे, रिहाना बाजी शेख, प्रमोद सदाशिवे, अशोक गेहलोत, जफर खान, रफिक शेख, सुनीता तायडे, सुनील साळवे, उत्तम दणके, पंकज वाळेकर, मुजफ्फर खान, नदीम मदणी, सलमान खान, सुमेध नारनावरे, सुफियान खान, सूर्यकांत गरड, मजाज खान, सलीम खान, सय्यद फयाजुद्दीन, साजिद कुरेशी, बुऱ्हाण पटेल, तय्यब पटेल आदी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थि
त होते.
What's Your Reaction?