विभागीय बाॅल बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेसाठी मनपा किराडपुरा शाळा पात्र

 0
विभागीय बाॅल बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेसाठी मनपा किराडपुरा शाळा पात्र

विभागीय बॉलबॅडमिंटन क्रीडा स्पर्धेसाठी मनपा केंद्रीय शाळा किराडपुरा पात्र...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज)- आयुक्त तथा प्रशासक श्री.जी.श्रीकांत यांच्या संकल्पनेतून आयोजित "आम्हाला खेळू द्या" अंतर्गत मनपा हद्दीतील जिल्हास्तरीय शालेय बॉलबॅडमिंटन क्रीडा स्पर्धा आज दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी मनपा केंद्रीय शाळा किराडपुरा नं.1 ऊर्दू शाळेचा मैदानात सुरु झालेल्या या स्पर्धचे उद्घाटन श्री.अंकुश पांढरे उपआयुक्त मनपा शिक्षण विभाग प्रमुख, श्री.ज्ञानदेव सांगळे समग्र शिक्षाअभियान कार्यक्रमाधिकरी, केंद्रीय मुख्याध्यापिका श्रीमती रईसा बेगम मॅडम इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला.

या स्पर्धेत एकूण 38 शाळांनी सहभाग घेतला होता. 

ही स्पर्धा 14,17 व 19 वर्षेआतील मुलांमध्ये झाली. 

स्पर्धेचा निकाल 

14 वर्षा आतील मुले.

विजय : मनपा केंद्रीय शाळा किराडपुरा नं. 1 ऊर्दू 

उपविजय : बून इंग्लिश स्कूल.

17 वर्षा आतील मुले.

विजय : मनपा केंद्रीय शाळा किराडपुरा नं. 1 ऊर्दू 

उपविजय : बून इंग्लिश स्कूल.

मनपा शाळेतील विजय संघाचे खेळाडूंना श्री.गणेश दांडगे सर नियंत्रण अधिकारी, श्री.संजू प्रसाद बालया सर मनपा क्रीडा अधिकारी, श्री.भरत तीनगोटे सर शिक्षणअधिकारी या सर्वांनी शुभेच्छा दिल्या. 

 विजयी संघाला क्रीडा प्रशिक्षक शेख आखेब जावेद जावेद यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow