विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी गणरायाचे उत्साहात आगमन
 
                                शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन...
सहकुटुंब विधिवत पूजन करुन विघ्नहर्ताचे केले सहर्ष स्वागत...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज): शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी शनिवार, ता. 7 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर गणरायाचे आगमन झाले. सहकुटुंब विधिवत पूजन करून विघ्नहर्ताचे दानवे परिवाराने सहर्ष स्वागत केले.
चिरंजीव ॲड धर्मराज दानवे आणि स्नुषा सौ. रश्मी धर्मराज दानवे यांच्या हस्ते गणेश उत्सवाच्या प्रथम दिवशी लंबोदराचे पुजन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया.. एक लाडू चंद्रावर गणपती बाप्पा बसले उंदरावर अशा जय घोष करत दानवे कुटुंबियांनी आगमनाचा क्षण आनंदात आणि उत्साहात साजरा केला.
गणेश उत्सवाच्या सोहळ्यात गणरायाचे घरात आगमन झाल्याने आनंद आणि उत्साह प्रतीक कुटुंबीयांच्या मनात निर्माण होतो. लोकमान्य टिळक यांनी सुरु केलेल्या या उत्सवाप्रति मराठी माणसाच्या हृदयात अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक मराठी माणूस हा मंगलमय सोहळा दरवर्षी जगत असल्याची भावना प्रकट करत तमाम गणेश भक्ताच्या जीवनातील दुःख नाहीये होऊन महाराष्ट्रातील जनता सुखी आणि समृद्ध झाली पाहिजे असे साकडे अंबादास दानवे यांनी गणरायाच्या चरणी घातले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            