वेरुळ -अजिंठा महोत्सवाचे शानदार उद्घाटन

 0
वेरुळ -अजिंठा महोत्सवाचे शानदार उद्घाटन

वेरूळ अजिंठा महोत्सवाचे शानदार उदघाटन...

पर्यटन विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू - पालकमंत्री संदीपान भुमरे...

औरंगाबाद, दि.2(डि-24 न्यूज)- वेरूळ अजिंठा महोत्सव हा जिल्ह्यातील जागतिक वारसा असलेली येथील पर्यटनस्थळे जगातील पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित केला जातो. रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता असलेल्या पर्यटन उद्योगाच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू,यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आज येथे केले.

वेरूळ अजिंठा महोत्सवाचे शानदार उदघाटन आज सोनेरी महाल परिसरात करण्यात आले.

उदघाटन सोहळ्यास अल्पसंख्यांक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार, आ. संजय शिरसाट, विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड, सेवा हमी आयुक्त दिलीप शिंदे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, पर्यटन विभागाचे उपसंचालक विजय जाधव, पर्यटन सदिच्छादूत नवेली देशमुख, संध्या पुरेचा, सारंग टाकळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री भुमरे म्हणाले की, शासनाने बंद पडलेला हा वेरूळ महोत्सव पुन्हा सुरू केला. या महोत्सवासाठी जो निधी लागेल तो दिला जाईल. जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी निधी मिळावा यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहोत. नुकतेच टूर ऑपरेटर संमेलनातून आपण पर्यटन व्यवसायातील मान्यवरांना एकत्र आणले. शहरातील पर्यटन विकासासाठी जास्तीत जास्त निधी दिला जाईल.

प्रास्ताविक विजय जाधव यांनी केले. त्यात त्यांनी पर्यटनमंत्री गिरीश महाजन,जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडये, यांनी महोत्सवासाठी मदत केल्याचा उल्लेख केला. तसेच महोत्सव यशस्वी करण्यासाठी पालकमंत्री, अधिकारी यांचे सर्व सहकार्य लाभल्याचे सांगितले. नवेली देशमुख, संध्या पुरेचा यांच्या चमूनी यांनी के

ले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow