व्यसनांपासून तरुणाईला रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा - डॉ.नरेंद्र वैद्य

 0
व्यसनांपासून तरुणाईला रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा - डॉ.नरेंद्र वैद्य

व्यसनांपासून तरुणाईला रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा ; डॉ. नरेंद्र वैद्य यांचे आवाहन...

स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने नशामुक्ती जनजागृती अभियान ; माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांचा पुढाकार

औरंगाबाद, दि.7(डि-24 न्यूज ) देशाचे उज्वल भविष्य असणारी तरुण पिढी विविध व्यसनांना बळी पडत आहे. लहान वयात चुकीच्या संगती मुळे नको त्या व्यसनांकडे शालेय व महाविद्यालीन विद्यार्थी बळी पडत असून हि भविष्यातील धोकादायक परिस्थिती रोखण्यासाठी प्रत्येकाने नशामुक्ती साठी पुढाकार घ्यावा असे आवाहन डॉ.नरेंद्र वैद्य यांनी स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित नशामुक्त जनजागृती अभियान निमित्ताने एन-3 येथील एसकेएम मैदानावर आयोजित कार्याक्रमात मंगळवारी केले.  

माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांच्या पुढाकाराने शालेय विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन तरुणांमध्ये नशामुक्ती बाबात जनजागृती व्हावी यासाठी “सशक्त भारत, नशामुक्त भारत” हे अभियान हाती घेतले असून तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी प्रमोद राठोड यांनी आयोजित कार्यक्रमात आपले प्रास्ताविक करतांना केले. यावेळी माजी नगरसेविका माधुरी अदवंत, पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश यादव, डॉ. सुर्यकांत शिरपेवार, डॉ.कृष्णा भावले, स्वाभिमान क्रीडा मंडळाचे सचिव विशाल दाभाडे, प्रदीप राठोड, समीर लोखंडे, अभिजित खरात, रऊफ पठाण, गिरीश बांगर, जीवन रौंदळ, अनिकेत जोशी, गोरख राठोड, अमरसिंग राजपूत, नितेश टेकाळे, विशाल काकडे, विक्रांत पंजाबी, प्रसिद्धी प्रमुख सचिन अंभोरे, स्वाभिमान क्रीडा मंडळाचे क्रीडा विभाग प्रमुख पंकज परदेशी, आरती परदेशी, सिद्धांत श्रीवास्तव, आकाश टाके, राहुल शिंदे, योगेश गायसमुद्रे, राहुल उगलमुगले, संतोष नागवे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ.नरेंद्र वैद्य म्हणाले की, कुटुंबातील सदस्यांचा मुलांशी होणारा संवाद कमी झाला असून आपला आनंद शोधण्यासाठी आणि एकाकी पणा घालवण्यासाठी माध्यमिक शाळेतील व महाविद्यालयीन तरुण कुसंगत आणि व्यसनांना बळी पडत आहे. त्यांना वेळीच रोखले नाही तर येणारे भविष्य हे त्यांच्या आयुष्य उध्वस्त करणारे असेल हि परिस्थिती चिंताजनक असल्याने प्रत्येकाला मन परिवर्तन घडविण्यासाठी नशामुक्ती अभियान राबवण्यासाठी पुढे यावे लागेल. तर पोलीस निरीक्षक राजेश यादव म्हणाले कि, व्यसनाच्या आहारी जाऊन मुलामधली गुन्हेगारी वाढत आहे. हे रोखण्यासाठी नशामुक्त अभियानास जी काही मदत लागेल ती पोलीस प्रशासन करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित “सशक्त भारत, नशामुक्त भारत” अभियान कार्यक्रमात उपस्थितांना मन परिवर्तन करणारा लघुपट यावेळी दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर लोखंडे यांनी केले

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow