शहागंज अतिक्रमण प्रकरणात एमआयएमचे विरोधीपक्षनेते, नगरसेवकांसह 30 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
शहागंज अतिक्रमण प्रकरण...
महापालिकेच्या पथाकाला शिवीगाळ करुन धमक्या; एमआयएमच्या नगरसेवकांसह 30 ते 40 जणांवर गुन्हा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज)- 27 फेब्रुवारी रोजी शहरातील शहागंज परिसरात सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईदरम्यान एमआयएमच्या काही नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याच्या धमक्या देत हाकलून लावले. ही घटना 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. प्रकरणात एमआयएमच्या नगरसेवकांसह 30 ते 40 कार्यकर्त्यांवर सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सविता अंनतराव सोनवणे (वय 54, रा. उल्कानगरी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार शहागंज भागात रहदारीस अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या व अन्य अनधिकृत अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू होती. ही कारवाई अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष बालाजी वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे करण्यात येत होती. यावेळी हा राडा झाला असल्याचा आरोप दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
यांच्यावर झाला सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर, नगरसेवक सय्यद उसामा अब्दुल कदीर, काकासाहेब काकडे, फेरोज खान मोईनोद्दीन खान, मुन्शी पटेल, सोहेल कुरेशी, मोहम्मद वाजेद अयूब जहागिरदार, मोहम्मद वसीम अलीम अहेमद, मेराज खान जलिल खान, मतीन पटेल, नगरसेविका पती अकील अहेमद, नगरसेविका पती सलिम सहारा, नगरसेविका जावई साबेर, नगरसेविका यांचे वडील अमजद चाचू यांच्यासह 30 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
What's Your Reaction?