शासकीय अध्यापक विद्यालयातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी उपसंचालक कार्यालयासमोर भरवला वर्ग...!
शासकीय डी.एड. महाविद्यालयातील शिक्षकांची पदे भरा; या मागणीसाठी केले ‘कॉलेज भरो आंदोलन’
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ), दि.3(डि-24 न्यूज)- शासकीय डी.एड. महाविद्यालयातील शिक्षकांची मंजूर पदे तातडीने भरण्यात यावीत, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, या मागणीसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने उपसंचालक कार्यालयासमोर ‘कॉलेज भरो आंदोलन’ करण्याचा करण्यात आला. यासंदर्भात भारतीय विद्यार्थी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जयशिल कांबळे यांनी छत्रपती संभाजीनगर विभागीय शिक्षण उपसंचालकांना निवेदन दिले आहे. जोपर्यंत शिक्षक नियुक्ती होत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला. नेकनूर अध्यापक विद्यालयात 46 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 11 महीन्यात पासून तेथे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या व्यतीरिक्त वर्गखोल्या गळतात. वाॅशरुम व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. भावि शिक्षकांच्या अध्यापनाची हि परिस्थिती आहे म्हणून प्रशासनाने तातडीने मागणी मान्य करावी अशी विनंती केली.
मराठवाड्यातील नेकनूर, वसमत, कन्नड, पैठण आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय डी.एड. महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. मराठवाड्यातील शासकीय डी.एड. महाविद्यालयात एकूण 428 विद्यार्थी शिक्षण घेत असून, शिक्षकांची 53 मंजूर पदे आहेत. मात्र, त्यापैकी केवळ 5 शिक्षक कार्यरत असून तब्बल 48 पदे रिक्त असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे मागील दहा महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. याबाबत विविध सामाजिक संघटनांनी वेळोवेळी निवेदने देऊनही प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भारतीय संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार बाधित होत असल्याने हा प्रश्न गंभीर असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने 3 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.
शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी मागणी भारतीय विद्यार्थी मोर्चाने केली आहे.
याप्रसंगी भारत मुक्ती मोर्चा महीला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ज्योती मिसाळ, सुजाता कस्तुरे, मुस्तफा पठाण, अरबाज सय्यद, मिर्झा जबीउल्लाह बेग, मुशायद मोमीन, सय्यद हामेद विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले
होते.
What's Your Reaction?