श्रीलंकेच्या संसदीय शिष्टमंडळाने दिली अजिंठा लेणीस भेट
श्रीलंका देशाच्या संसदीय शिष्टमंडळाने दिली अजिंठा लेण्यास भेट
औरंगाबाद,दि.17
(डि-24 न्यूज)- श्रीलंका देशाचे संसदीय शिष्टमंडळ आज अजिंठा लेण्यांची भेट देण्यासाठी आले होते. काल (शनिवार दि.16) जिल्ह्यात हे 20 सदस्यीय शिष्टमंडळ दाखल झाले होते. आज सायंकाळी विमानाने हे शिष्टमंडळ नवी दिल्ली कडे रवाना होईल.
या शिष्टमंडळाचे नेते, श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अबेवर्देना, त्यांची पत्नी सुश्री नेलुम ललना यापा अबेवर्धना, मुख्य व्हीप प्रसन्न रणतुंगा, खासदार जीवन ठोंडमन, उपसभापतीअजित राजपक्षे, समितीचे उपाध्यक्ष अंगजन रामनाथन,खासदार निरोशन परेरा, वीरसुमना वीरासिंघे, मो.मुझम्मील, उदयकुमार, वरुणा प्रियंथा लियानागे, जगथ समरविक्रम, एम. रामेश्वरन,महासचिव सौ. कुशाणी अनुषा रोहनाडीरा , उपसचिव चामिंडा कुलरत्ने, सहाय्यक संचालक प्रशासन जयलथ परेरा, डॉ.चमीरा यापा अबेवर्देना, जिनलाल चुंग, उपसचिव मुकेश कुमार, एल्डोस मॅथ्यू पुन्नूज, कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकारी यांचा समावेश होता.
या शिष्टमंडळा सोबत महाराष्ट्र राज्य विधानमंडळ उपसचिव उमेश शिंदे, कक्ष अधिकारी विनोद राठोड जिल्हा प्रशासतील राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, सोयगाव तहसीलदार मोहनलाल हरणे, तसेच संबंधित अधिकारी यांची उपस्थिती होती. या शिष्टमंडळाचे शहरात काल (दि.16) आगमन झाले होते. आज सकाळी हे शिष्टमंडळ अजिंठा लेण्याची पाहणी करण्यासाठी अजिंठा येथे आले होते.
What's Your Reaction?