सरकारने शास्वत पर्यटनासाठी प्रोत्साहन द्यावे, धोरण आखावे, आयटो परिषदेचा दुसरा दिवस

 0
सरकारने शास्वत पर्यटनासाठी प्रोत्साहन द्यावे, धोरण आखावे, आयटो परिषदेचा दुसरा दिवस

सरकारने शाश्वत पर्यटनासाठी प्रोत्साहन द्यावे, धोरण आखावे

- विषयतज्ज्ञांनी व्यक्त केली गरज 

- एकापाठोपाठ एका सत्रांनी गाजवला आयटो परिषदेचा दुसरा दिवस 

औरंगाबाद, दि.30(डि-24 न्यूज) सरकारी यंत्रणांनी शाश्वत पर्यटनाकडे वळू पाहणाऱ्या व्यावसायिकांना प्रोत्साहन द्यायला हवे. त्याचबरोबर शाश्वत पर्यटनासाठी धोरण आखण्याची गरज असल्याचे मत विषयतज्ज्ञांनी आज व्यक्त केले. विविध राज्यांचे सादरीकरण आणि एकापाठोपाठ एक सत्रांनी आयटो परिषदेचा दुसरा दिवस गाजवला.

शहरात सुरू असलेल्या अडोतीसव्या आयटो परिषदेसाठी देशभरातून आलेल्या सदस्यांपुढे विविध विषयांवर आज मंथन झाले. रवी गोसाईं यांच्या स्वागतपर भाषणानंतर माजी अध्यक्ष प्रोनोब सरकार यांनी समीक्षण केलेल्या 'इनबाऊंड टुरिझम, सस्टनिबिलिटी, स्ट्रॅटेजी अँड इमेर्जिंग ट्रेंड्स' या विषयावर चर्चा झाली. यात राकेश कुमार वर्मा (अतिरिक्त सचिव, पर्यटन, भारत सरकार), राधिका रस्तोगी (प्रधान सचिव, पर्यटन, महाराष्ट्र सरकार), नंदिनी चक्रबोर्ती (प्रधान सचिव, पर्यटन, पश्चिम बंगाल सरकार), नंद किशोर (व्यवस्थापकीय संचालक, बिहार स्टेट टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) आणि कपिल गोस्वामी (व्यवस्थापकीय संचालक, ट्रान्स इंडिया हॉलिडे) यांनी आपली मते मांडली. 

यावेळी राकेश कुमार वर्मा म्हणाले, 'शाश्वत पर्यटनात आम्ही सगळ्या प्रकारचे पर्यटन समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतो आहोत. शाश्वत पर्यटनाबाबत बोलताना ऊर्जा, पाणी आणि कचरा यांच्या विषयी गांभीर्याने विचार व्हायला हवा आणि तो अविभाज्य घटक असायला हवा. केंद्र सरकारने शाश्वत पर्यटनावर काम करणाऱ्याना ओळख देण्याचे काम करण्यात येत आहे. हे करताना लोकांचे मतपरिवर्तन करणे आणि त्यांना शाश्वत पर्यटनाकडे नेण्याचे आवाहन आपल्यापुढे आहे'. 

महाराष्ट्राच्या पर्यटन प्रधान सचिव राधिका रस्तोगी म्हणाल्या, 'पारंपरिक पर्यटनाचे दिवस आज संपले आहेत. लोक बरेच काही शोधतात आणि ते त्यांना कमी बजेटमध्ये मिळावे यासाठीही प्रयत्न करतात. महाराष्ट्र राज्य सरकारकडे अद्याप शाश्वत पर्यटनाचे धोरण असे नाही, जी येत्या काही महिन्यात तयार होणार आहे. लोकांनी पर्यटनस्थळांची पाहणी करताना आजूबाजूला मिळणाऱ्या व्यंजनांची चवही चाखायला हवी. राज्य सरकार खासगी क्षेत्रातील पर्यटन व्यावसायिकांकडून गुंतवणुकीची अपेक्षा ठेवते. अशा वेळी लघु व्यवसायिकांकडेही आमचे लक्ष आहे'.

नंदिनी चक्रबोर्ती म्हणाल्या, 'पर्यटक आता प्लास्टिकचा वापर कमी करायला लागले आहेत. पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा हा उत्सव पाहण्यासाठी देशासह परदेशातूनही लोक येतात. पश्चिम बंगालमध्ये ग्रामीण पर्यटनावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे जिथे 100 गावांतील 400 पर्यटनस्थळे निवडण्यात आले आहेत'.

बिहार पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक नंद किशोर म्हणाले, 'बिहारमधील पायाभूत सुविधा दिवसंदिवस उन्नत होत आहेत. याशिवाय बिहार हे राज्य आता अधिक सुरक्षितही झाले आहे. बिहार हे बुद्धिजम आणि जैनिजमचा उगम असल्याने लोकांचा ओढा इकडे मोठा आहे. याशिवाय बिहारमध्ये अनेक प्रकारच्या पर्यटनाची मांदियाळी आहे'. 

कपिल गोस्वामी यांनी शाश्वत पर्यटनात काम करणाऱ्याना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. त्यांना धोरणात सहभागी करून घेत सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज मिळवणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळायला हवे'.

यानंतर बिहार, पंजाब, उत्तर प्रदेश, ओडिशा, गुजरात या राज्यांचा प्रतिनिधींनी त्यांच्या राज्यातील पर्यंतनस्थळांचे सादरीकरण केले. महाराष्ट्राच्या वतीने पर्यटन संचालक डॉ. बी. एन पाटील यांनी राज्यात दडलेल्या मात्र पर्यटनाच्या नकाशावर नसलेल्या ठिकाणांचे दर्शन घडवले. 

शनिवारी (ता. 30) सिनर्जी बिटविन हॉटेल अँड टूर ऑपरेटर्स' या विषयावर होमा मिस्त्री यांनी सत्र घेत प्रवीण चंदेर कुमार (कार्यकारी उपाध्यक्ष - सेल्स आणि मार्केटिंग, द इंडियन हॉटेल्स कंपनी), एसपी जैन, (एमडी प्राईड हॉटेल्स अँड रेजोर्टस), माधव सेहगल (एरिया व्हाईस प्रेसिडेंट, दक्षिण भारत, द लीला हॉटेल्स), समीर एमसी (एमडी, फॉर्च्युन पार्क हॉटेल्स). 

क्रूझ टुरिझमला भारतात चांगले दिवस 

भारतातील क्रूझ टुरिजमला चांगले दिवस आहेत. क्रूझवर येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असून आगामी काळात भारत क्रूझ टुरिजमच्या क्षेत्रात तिसऱ्या स्थानावर असेल, अशी अपेक्षा 

कोरडेलिया क्रुजचे मुख्य कार्यकारी अधिकारी जरगेन बैलोम यांनी सांगितले. देशातील सरकार या क्षेत्राकडे चांगल्या पद्धतीने पाहत आहे आणि या माध्यमातून देशात साधारण साडेतीन लाख नोकऱ्या तयार होणार असल्याचे ते म्हणाले. याच कार्यक्रमात मालिनी गुप्ता म्हणाल्या की 'सरकारने क्रुज पर्यटनाला अधिक मदत करायला हवी. कारण ज्यावेळी क्रुज काठावर येतात तेव्हा पर्यटनात कोणताही व्यत्यय यायला नको'. 

याशिवाय सिनर्जीज फॉर सक्सेस आणि द चेंजिंग फेस ऑफ टेक्नॉलॉजी फॉर टूर ऑपरेटर्स या विषयांवरही मंथन पार पडले. 

आज समारोपीय कार्यक्रम...

आयटोच्या 38 व्या कन्व्हेन्शनचा समारोपीय सोहळा रविवारी दुपारी अडीच वाजता पर्यटन मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत होणार आहे. 

तत्पूर्वी सकाळी आयटोच्या वतीने 'रन फॉर रिस्पॉन्सिबल टुरिजमचे आयोजन करण्यात आले आहे. ही रन हॉटेल रामा इंटरनॅशनल ते जिमखाना हॉटेल (आणि परत) दरम्यान होणार आहे. सत्रांनी सुरुवात सकाळी 10 वाजता कनेक्टिव्हिटी - न्यू डायमेंशन, एअर, रोड, रेल्वे या विषयाने होणार आहे. रविवारी विविध सत्रांमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री संदीपान भुमरे, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे, महापालिका आयुक्त जी श्रीकांत विविध सत्रांमध्ये आपली मते मांडणार आहेत. 

राज्याचे माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे देखील या परिषदेस उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11 वाजता होणाऱ्या 'एक्सप्लोरिंग महाराष्ट्र - न्यू डेस्टिनेशन्स अँड ऑपोर्तुनिटी' या विषयावर ते दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, ऍग्री टुरिजम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक पांडुरंग तावडे यांच्यासह ते आपले मत मांडणार असल्याचे अयोजकांनी कळवले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow