साखरपुड्यात लागले साध्या पद्धतीने लग्न, देशमुख - पटेल कुटुंबाला नातेवाईकांनी दिले शुभेच्छा
साखरपुड्यात लागले लग्न, देशमुख पटेल कुटुंबांना दिले शुभेच्छा
औरंगाबाद, दि.20(डि-24 न्यूज) शहराच्या काही अंतरावर नायगाव येथे सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील देशमुख कुटुंब साखरपुड्यासाठी आले आणि नातेवाईकांनी पुढाकार घेत आज मंगळवारी पाच वाजता निकाह संपन्न झाला. साध्या पद्धतीने निकाह संपन्न झाल्याने पटेल व देशमुख कुटुंबातील नातेवाईकांनी व मित्र परिवाराने शुभेच्छा दिल्या.
घाटनांद्रा येथील खालिद अब्दुल हाफीज देशमुख यांचा जेष्ठ मुलगा मुस्तकीम व नायगाव येथील साबेर पटेल यांची कन्येचा आज निकाह साध्या पद्धतीने झाला. इस्लामच्या शिकवणीनुसार अवाढव्य खर्च न करता अशा प्रकारे लग्न करावे असा मोठा संदेश समाजाला देशमुख व पटेल कुटुंबाने दिला आहे. नायगाव येथील मुलगी बादशहा पटेल यांची नात आहे. देवलगावबाजार येथील उपसरपंच अजिज देशमुख, घाटनांद्रा येथील अक्रम देशमुख, नायगावचे हाजी उमर पटेल यांच्या पुढाकाराने हा लग्नसोहळा पार पडला.
What's Your Reaction?