सुंदरवाडी, प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा गृहकर्ज मेळाव्याला प्रतिसाद...!

 0
सुंदरवाडी, प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा गृहकर्ज मेळाव्याला प्रतिसाद...!

सुंदरवाडी, प्रधानमंत्री आवास योजनेच्या गृहकर्ज मेळाव्याला प्रतिसाद...

सरकारी बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देण्याची लाभार्थ्यांची मागणी...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.20 (प्रतिनिधी)- सुंदरवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लकी ड्रॉ मध्ये भाग्यवान ठरलेल्या लाभार्थ्यांना गृहकर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवारी बँक, विकासक व मनपा एका छताखाली येत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मोठ्या संख्येने लाभार्थ्यांनी उपस्थित राहुन प्रतिसाद दिला.

सुंदरवाडी येथे 3288 सदनिका बनणार आहे. दोनशेहून अधिक लाभार्थ्यांनी दहा टक्के रक्कम जमा केली आहे. सुंदरवाडी, पडेगाव, हर्सुल, तीसगाव येथे 11120 फ्लॅट सर्व सोयी सुविधा युक्त बनवले जात आहे. सुंदरवाडी येथे 9,26,382 रुपये घरकुलाची किंमत आहे त्यापैकी केंद्र सरकारकडून अडीच लाख रुपये अनुदान मिळणार आहे ती रक्कम या किमतीतून वजा होणार आहे. कामगार मंडळाकडे नोंदणीकृत कामगारांना दोन लाखांचा लाभही मिळू शकतो.

याप्रसंगी मनपा उपायुक्त अपर्ना थेटे यांनी मार्गदर्शन केले. लाभार्थ्यांनी लवकरात लवकर दहा टक्के रक्कम भरुन कर्ज मंजूरीसाठी प्रस्ताव दाखल केला तर विकासकाला काम लवकर करण्यासाठी समस्या येणार नाही. नवीन इच्छुक लाभार्थ्यांना घरकुलसाठी वेबसाईटवर अर्ज दाखल करावे पुन्हा लकी ड्रॉ काढण्याचे नियोजन महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. सरकारी बँका असो खाजगी बँका कोणत्याही बँकेकडून लाभार्थी गृहकर्ज घेवू शकतात असे कोणतेही बंधन नाही. हि योजना लवकरात लवकर पूर्णत्वास यावी व आपल्याला स्वप्नातील गृह प्रवेश लवकर व्हावा यासाठी मनपा प्रशासन प्रयत्न करत आहे हा या मेळाव्याचा उद्देश आहे. महापालिका मुख्यालयासमोर कला दालन येथे बँकेचे प्रतिनिधी व महापालिका कर्मचारी लाभार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी दररोज बसणार आहे इच्छूकांनी तेथे संपर्क करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

लाभार्थ्यांनी मनपा उपायुक्तांना प्रश्न विचारले की खाजगी बँकांचा रेट ऑफ इंटरेस्ट जास्त असल्याने महापालिका प्रशासनाने सरकारी बँकांकडून गृहकर्ज उपलब्ध करून द्यावे. आमची सदनिका त्यांच्याकडे गहाण ठेवा. सदनिकेचा ताबा कधी मिळणार आहे. कामगार कार्ड रिनिवल होत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. रिनिवल झाले तर दोन लाखांचा लाभार्थ्यांना मदत होईल. दहा टक्के रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी. गृहकर्ज साठी कोणती कागदपत्रे लागतील असे प्रश्न मेळाव्याला लाभार्थ्यांनी विचारले. याप्रसंगी बँकेच्या प्रतिनिधींनी गृहकर्ज उपलब्ध करून देण्यासाठी माहिती दिली.

याप्रसंगी मनपा उपायुक्त सविता सोनवणे, विकासक रियाज खान बिस्मिल्ला खान, रेहान खान अन्वर खान, आर्किटेक्ट स्वप्नील सराफ, प्रकल्प सल्लागार लक्ष्मीकांत बेर्डे उपस्थित होते. स्थापत्य अभियंता अर्जुन फापळे यांनी सुत्रसंचलन

केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow