सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे खाजगीकरण करणारे सरकार रद्द करा, आयटकची आंदोलनात मागणी
 
                                सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे खाजगीकरणाविरोधात आयटकची निदर्शने ! औरंगाबाद, दि.5(डि-24 न्यूज) घाटीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करून गोरगरिबांच्या उपचारावर गदा आणू नका, दुकानदारी करु नका या मागणीसाठी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटक तर्फे आर एम ओ ऑफीस समोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
यावेळी घाटीचे खाजगीकरण करणारे व त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचा निवडणुकीत पराभव करा, खाजगीकरण हाणून पाडा असे आवाहनही आयटक चे अॅड अभय टाकसाळ यांनी केले. महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना अनेक वर्षांपासुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्नालयऔरंगाबाद येथे एम आर आय सिटी स्कॅन , औषध, इंजेक्शन, मोफत द्या यासाठी सतत संघर्ष करीत आहे. सरकारी संस्था सांभाळायला दिल्या विकायला, दुकानदारी करायला नाही अशा भावनाही उपस्थित रुग्नांचे नातेवाईकांनी व्यक्त केल्या. शिंदे, फडणवीस, अजीत पवार शरम करो, घाटी बेचना बंद करो, सुपर स्पेशालीटी हाॅस्पीटलचे खाजगीकरण हाणुन पाडा, घाटी गरीबाच्या हक्काची नाही कुणाची बापाची,
इत्यादी घोषणांनी घाटी फरीसर दणाणुन गेला. यावे॓ळी बीएसएनएल एम्लाॅइज युनियनचे नेते काॅ रंजन दाणी, समाजवादी पार्टीचे फैसल खान, भिमशक्ती रोजंदारी कर्मचारी युनियनचे कीरणराज पंडीत यांनीही या आंदोलनाला पाठींबा दिला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटी हॉस्पिटल औरंगाबाद येथे जवळपास 11 जिल्ह्यामधून हजारो ग्रामीण व शहरी गोरगरीब रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात सध्याच्या व्यवस्थेमध्ये मोफत व दर्जा उपचार देण्याऐवजी 150 कोटी रुपये जनतेचा पैसा खर्चून उभी राहिलेली सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची इमारत मंत्र्यांच्या बगलबच्चांना दुकानदारी करण्यासाठी खाजगीकरणाचा निर्णय शिंदे फडणवीस अजित पवार सरकारने घेतला आहे हा निर्णय रद्द झाला पाहिजे. खाजगीकरणाचा जनविरोधी निर्णय रद्द केला नाही तर हे सरकार येत्या निवडणुकीत रद्द करून टाकू, रुग्णांच्या नातेवाईकांनी कर्मचाऱ्यांनी जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने आर एम ओ ऑफिस समोरील निदर्शनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्नालय औरंगाबादचे अधिष्ठाता डाॅ. विजय राठोड यांच्या मार्फत मुख्यमंञी, एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवण्यात आले. नांदेडच्या डीन यांचा अपमान करणा-या शिंदे गटाच्या खासदाराचा राजीनामा घ्या, कथित कंञाटी कामगारांना दरमहा 15000/- रुपये वेतन त्यांच्या खात्यात जमा करा, औषध, इंजेक्शन, एम आर आय सिटी स्कॅन मोफत द्या इत्यादी मागण्या करण्यात आल्या. यावेळी अॅ अभय टाकसाळ, किरण पंडित, राजु हिरवळे , विकास गायकवाड , अनिता हिवराळे संघटक, जॅक्सन फर्नांडिस , माधुरी जमदाडे , यासह मोठ्या संख्येने रुग्नांचे नातेवाईक आणि घाटी शाखेतील सर्व सभासद उपस्थित होते. दोन तास निदर्शने चालली.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            