स्पर्धा परीक्षा पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा बनवा- आप
आम आदमी पार्टीने केले भिक मांगो आंदोलन
औरंगाबाद, दि.29(डि-24 न्यूज) नोकर भरतीमध्ये परीक्षा शुल्क 900 ते 1000 रुपये घेत असल्याने या विरोधात आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीच्या वतीने औरंगपुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर भिक मांगो आंदोलन करुन निषेध केला.
नुकतीच राज्य सरकारने विविध विभागांच्या शासकीय नोकर भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लुबाडण्याचा काम राज्य सरकार करत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. परीक्षा शुल्क 900 ते 1000 रुपये वाढवून एका एका विद्यार्थ्याला चार ते पाच हजार रुपये घेऊन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र विरोधाभासी चित्र बघा युपीएससी सारख्या देशातील प्रतिष्ठित स्पर्धा परीक्षेची स्पर्धा परीक्षेची प्रवेश शुल्क हे शंभर ते दीडशे रुपये असते. राज्य शासनाच्या गट क आणि ड पदाच्या भरतीचे शुल्क वाढवल्याने अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. ते संधी आणि क्षमता असूनही केवळ परीक्षा शुल्क अभावी पेपर देण्यास धजावत नाहीत. तसेच राज्य शासनाने सन 2019 पासून आरोग्य विभाग, वन विभाग, पोलिस भरती, म्हाडा आणि तलाठी भरतीचे पेपर फुटुन चुकीच्या मार्गाने पेपर देणारे विद्यार्थी हे प्रमाणिक प्रयत्न करणा-या विद्यार्थ्यांच्या जागा हिरावून घेत आहे. म्हणून या पेपर फुटी संदर्भात राज्य शासनाने त्वरित एसआयटी चौकशी करावी. तसेच या पेपर फुटी संदर्भात कठोर कायदा करुन दंडात्मक तरतूदही करावी, यासाठी आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष सतीश लोखंडे वेरुळकर यांच्या नेतृत्वाखाली आज भिक मांगो आंदोलन करण्यात आले.
यावेळी राज्य सचिव हनुमंत चाटे, मराठवाडा संघटनमंत्री सुग्रीव मुंडे, जिल्हाध्यक्ष सुभाष निकम, सचिव दत्तू पवार, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष सलीम पटेल, अल्पसंख्याक अध्यक्ष सय्यद सलाओद्दीन, महीला जिल्हाध्यक्ष मेघा राईकवार, शहराध्यक्ष शेख इम्रान, महीला शहराध्यक्ष ज्योतीताई जाधव, शहर सचिव सतीश दूनघव, लोडींग रिक्षा अध्यक्ष ख्वाजा किस्मतवाला, एमपीएससी समन्वय समितीचे दिगंबर वैद्य, अनिल साखरे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?