स्वातंत्र्याच्या 76 वा वर्धापन दिनानिमित्त विभागीय माहिती कार्यालयात ध्वजारोहण
स्वातंत्र्याच्या 76 वा वर्धापनदिन सोहळा...
विभागीय माहिती कार्यालयात ध्वजारोहण...
औरंगाबाद, दि.15 (डि-24 न्यूज)- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि माहिती केंद्र, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी सर्वांनी राष्ट्रध्वजास सलामी देऊन राष्ट्रगीत म्हटले. यावेळी सहायक संचालक गणेश फुंदे, माहिती अधिकारी मीरा ढास, आदींसह संचालक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, माहिती केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.
What's Your Reaction?