हज हाऊसमध्ये अल्पसंख्याक आयुक्तालयाच्या कार्यालयाला काँग्रेसचाही विरोध...!

 0
हज हाऊसमध्ये अल्पसंख्याक आयुक्तालयाच्या कार्यालयाला काँग्रेसचाही विरोध...!

हज हाऊसमध्ये अल्पसंख्याक आयुक्तालयाच्या कार्यालयाला काँग्रेसचाही विरोध...! जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना दिले निवेदन 

 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.24(डि-24 न्यूज) अनेक दिवसांपासुन प्रलंबीत असलेले हज हाऊस आताच सुरु करण्यात आलेले आहे. परंतु येथे हळुहळु शासकीय कार्यालय येण्याची प्रक्रिया शासनाने केली आहे. परंतु येथे जागे अभावी हज हाऊस इमारती मध्ये पवित्र हज यात्रेसाठी हज यात्रेकरुंना ट्रेनिग (प्रशिक्षण) देण्यात येते. तसेच संपुर्ण मराठवाडयातून येणा-या भाविकांची राहण्याची, जेवण्याची व्यवस्था करण्यात येते. म्हणुन हज हाऊस येथे जागे अभावी कोणतेही शासनाचे कार्यालय येवू नये. शासनाचे कार्यालय येथे आले असता येथे येणा-या भाविकांची गैरसोय होईल व आता शासनाने स्थापन केलेल्या अल्पसंख्याक आयुक्त कार्यालय यांचे आम्ही स्वागत करतो परंतु हज हाऊस येथे न येत अन्य कोणत्याही ठिकाणी अल्पसंख्याक आयुक्त कार्यालयाला जागा देण्यात यावी. हि विनंती नसता आम्ही लोकशाही मार्गाने निदर्शने आंदोलन करण्यात येईल. याची नोंद घ्यावी असे निवेदन शहर जिल्हा काँगेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना निवेदन देण्यात आले.    

यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ, गुलाब पटेल, डॉ.अरुण शिरसाठ, अनिस पटेल, बबन डिंडोरे पाटील, डॉ.निलेश अंबेवाडीकर, मोईन ईनामदार, सलीम खान, माधवी चंद्रकी, आसमत खान, शेख कैसर बाबा, सुनिल डोणगांवकर, मुददसिर अन्सारी, फराज आबेदी, शफिक शहा, हकीम पटेल, रफिक खान, विजय कांबळे, लतिफ पटेल, जमील खान, सलीम खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow