हर्षवर्धन जाधव यांना खासदार बणण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर व शांतिगिरा महाराज यांचे हवे "आशिर्वाद"
हर्षवर्धन जाधव यांना हवी वंचितची उमेदवारी, शांतिगिरी महाराज यांचे "आशीर्वाद", म्हणाले शहर आणि जिल्ह्यात परिवर्तनाची गरज...!
औरंगाबाद, दि.31(डि-24 न्यूज) कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी व शांतिगिरी महाराज यांचे आशीर्वाद पाहीजे अशी माहिती पत्रकार परिषदेत जाधव यांनी दिली आहे.
त्यांनी पुढे सांगितले शिवसेनेत फुट पडलेली आहे व एम आय एम सोबत वंचित नाही यामुळे यावेळी राजकीय गणिते वेगळी असल्याने मला वंचितची उमेदवारी मिळाल्यास विजय होऊ शकतो अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत जाधव यांना 2 लाख 80 हजार मते मिळाली होती त्या मतांमध्ये फुट पडलेली नाही वंचितची उमेदवारी मिळाली तर उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
शिंदे बोलतात मी हिंदू आहे मला मते द्या, खैरे हिंदूंना बोलतात मला मत द्या, इम्तियाज जलील मुस्लिम समाजाला बोलतात मला मत द्या, धर्माच्या नावावर मते मागतात. इम्तियाज जलील निवडणूक आली की मंदीरात, चर्चमध्ये जातात, पाच वर्षांत बुध्द विहारात गेले होते का....असा सवाल त्यांनी विचारले. पाण्याच्या प्रश्नावर मनपा समोर मी पाच दिवस ठिय्या आंदोलन केले. तेव्हा कोठे होते चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील. दोघांनीही खासदार असताना पाणी प्रश्न सोडविण्यासाठी निधी दिला का असा प्रश्न त्यांना जनतेने विचारले पाहिजे. कौम का आदमी म्हणत इम्तियाज जलील बाळासाहेब आंबेडकर यांच्या मतांवर निवडून आले कौमचा काय फायदा झाला. गुलगुले खाल्यानंतर पाणी पाजले का...अथवा कौमच्या लोकांना खजूर तरी मिळाली का...? मी कन्नडमध्ये शादीखाने बनवले जलिल यांनी बनवले का...कन्नडचे दर्गाचे सुशोभिकरण केले एक पैसा तरी इम्तियाज जलील यांनी लावला का...? मी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन शहर जिल्ह्याच्या विकासासाठी राजकारण करत आहे. या निवडणुकीत वंचितची उमेदवारी मिळाली नाही तरी बाळासाहेब आंबेडकर व शांतिगिरी महाराज यांचे आशीर्वाद मिळाले तरी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
What's Your Reaction?