6 महीन्यांच्या चिमुकलीचे अपहरण करुन दिड लाखांत विक्री, आरोपिंना अटक...

6 महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण करुन दिड लाखात विक्री, पोलिसांनी आरोपींना केली अटक...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) 6 महीन्याच्या चिमुकलीचे अपहरण करुन हैदराबाद येथील व्यापा-याला दिड लाखात विक्री करण्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली. विक्री करणा-या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील पोलिसांनी ही कारवाई केली आहे. CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी शोध करत आरोपींना जेरबंद केले आहे.
गुजरातमधील अहमदाबादच्या ढोलका परिसरातून 6 महिन्यांच्या मुलीचे अपहरण करुन हैदराबादमधील व्यापाऱ्याला दिड लाख रुपयांत विक्रीचा सौदा ठरला होता. मुलीचे अपहरण केल्यावर आरोपी छत्रपती संभाजीनगर मार्गे रेल्वेने हैदराबादला निघाले होते. CCTV फुटेज व तांत्रिक तपासातून आरोपी महाराष्ट्राच्या दिशेने निघाल्याचे निष्पन्न होताच गुजरात पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी तात्काळ गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. त्यानंतर पथक तातडीने रेल्वेस्थानकावर पोहोचले. CCTV फुटेजच्या वर्णनावरून आरोपी मनीषा बिमलसोबत जयेशही मिळून आला. त्यानंतर चिमुकलीला ताब्यात घेत सर्वांना अटक करण्यात आली आहे.
What's Your Reaction?






