MKCL ची महाराष्ट्रात AI मास्टर क्लास सुरू करण्याची घोषणा

 0
MKCL ची महाराष्ट्रात AI मास्टर क्लास सुरू करण्याची घोषणा

आपण करूया महाराष्ट्र AI रेडी

MKCL च्या रौप्यमहोत्सवी वर्षात MS-CIT ला प्रतिष्ठित SKOCH Award प्राप्त; नवीन AI-सक्षम MS-CIT, KLiC कोर्सेस व मोफत AI मास्टरक्लासची राज्यव्यापी घोषणा. समीर पांडे मॅनेजजिंग डायरेक्टर 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) - गेल्या अडीच दशकांत महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) ने तब्बल 1.7 कोटीहून अधिक विद्यार्थ्यांना MS-CIT च्या माध्यमातून डिजिटल साक्षर केले आहे. आपल्या रौप्यमहोत्सवी (25 वर्षपूर्ती) वर्षाचे औचित्य साधून MKCL ने ‘आपण करूया महाराष्ट्र AI रेडी’ ही राज्यव्यापी मोहीम हाती घेतली असून, त्याअंतर्गत नव्याने अद्ययावत केलेला AI-सक्षम MS-CIT कोर्स, 265 हून अधिक KLiC व्यावसायिक कोर्सेस आणि मोफत AI मास्टरक्लास विद्यार्थी, पालक व नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. याच दरम्यान MS-CIT या उपक्रमाला राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित SKOCH Award प्राप्त झाल्याने ही मोहीम अधिक उत्साहाने पुढे नेली जात आहे.

MS-CIT ला प्रतिष्ठित SKOCH Award — अभिमान महाराष्ट्राचा!

MKCL च्या MS-CIT या राज्यव्यापी डिजिटल साक्षरता उपक्रमाला देशपातळीवरील प्रतिष्ठित SKOCH Award प्रदान करण्यात आला आहे. Digital Literacy या श्रेणीत मिळालेला हा सन्मान MKCL च्या गेल्या 25 वर्षांतील डिजिटल शिक्षण, कौशल्य विकास, सामाजिक समावेशन आणि नागरिक सक्षमीकरणातील सातत्यपूर्ण योगदानाची राष्ट्रीय पातळीवरील दखल आहे.

SKOCH Award हा भारतातील शासन, डिजिटल परिवर्तन, सामाजिक विकास, कौशल्यवृद्धी आणि नागरिकाभिमुख उपक्रमांना दिला जाणारा एक मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मानला जातो. महाराष्ट्रातील कोट्यवधी विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना डिजिटल जगाशी आत्मविश्वासाने जोडण्याचे कार्य MS-CIT ने गेली अनेक वर्षे प्रभावीपणे केले आहे.

या सन्मानाबद्दल MKCL चे व्यवस्थापकीय संचालक श्री. समीर पांडे यांनी सांगितले की, “हा पुरस्कार MKCL परिवारासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. हा सन्मान कोट्यवधी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा, तसेच हजारो केंद्रप्रमुख, केंद्र समन्वयक, प्रशिक्षक, नेटवर्क पार्टनर्स, MSBTE, MKCL मधील सर्व सहकारी, संस्थापक मार्गदर्शक, तसेच महाराष्ट्र शासनाने दिलेल्या विश्वासार्ह पाठबळामुळे आहे. या सर्व घटकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे MS-CIT ने महाराष्ट्रात डिजिटल परिवर्तनाची व्यापक चळवळ उभारली आहे.”

‘आपण करूया महाराष्ट्र AI रेडी’ मोहीम व मोफत AI मास्टरक्लास

MKCL च्या 25 वर्षपूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून ‘आपण करूया महाराष्ट्र AI रेडी’ ही राज्यव्यापी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रभरातील MKCL च्या अधिकृत शिक्षण केंद्रांमार्फत (ALC) शाळा, महाविद्यालये तसेच निवासी भागांमध्ये थेट पोहोचून नागरिकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत (AI) जागरूकता निर्माण केली जात आहे. ही मोहीम 23 जून 2026 पासून सुरू झाली असून ती पुढील 60 दिवस चालणार आहे.

या मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास. www.mscit.ai या संकेतस्थळावर साध्या नोंदणी प्रक्रियेद्वारे कोणताही नागरिक हा मास्टरक्लास मोफत उपलब्ध करून घेऊ शकतो. नोंदणीनंतर वापरकर्त्याच्या निवडीनुसार संबंधित मास्टरक्लास उपलब्ध करून दिला जातो. हा मोफत AI मास्टरक्लास शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, व्यावसायिक/ कर्मचारी (Professionals), पालक व शिक्षक या घटकांसाठी उपयुक्त आहे:

हा मास्टरक्लास पूर्ण केल्यावर त्यांना MS-CIT केंद्रामार्फत आकर्षक प्रमाणपत्र ही मिळेल. मास्टरक्लास पूर्ण केल्यानंतर अधिक सखोल मार्गदर्शन, समुपदेशन व प्रवेशाच्या संधींसाठी इच्छुकांनी आपल्या जवळच्या MS-CIT केंद्राशी संपर्क साधावा.

नवीन AI-सक्षम MS-CIT कोर्स

आयटी क्षेत्रातील पायाभूत ज्ञान देणारा सर्वोत्तम कोर्स म्हणून MS-CIT ची ओळख आहे. एकाच कोर्सला दोन कोटीहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे हा एक जागतिक विक्रमच आहे. बदलत्या AI-आधारित युगाच्या गरजा लक्षात घेऊन MKCL ने पारंपरिक MS-CIT कोर्स अधिक अद्ययावत करून त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर सुरक्षा (Cyber Security), डेटा साक्षरता (Data Literacy) आणि क्लाउड कंप्युटिंग (Cloud Computing) यांसारख्या नवयुगातील कौशल्यांचा समावेश केला आहे.

नव्या कोर्समध्ये विद्यार्थी ChatGPT, Microsoft Copilot, Google Gemini, Canva AI यांसारख्या 125 हून अधिक AI टूल्सचा व 250 हून अधिक आधुनिक डिजिटल स्किल्स प्रत्यक्ष वापर करून शिकतात. याशिवाय विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाचा अनुभव देण्यासाठी ‘ERA KRANTI’ हा AI आधारित पर्सनलाइज्ड चॅटबॉट उपलब्ध करून देण्यात आला आहे, ज्याद्वारे विद्यार्थी व्हिडिओ पाहतानाच आपल्या शंकांचे निरसन करू शकतात.

MS-CIT ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Certificate of Computer Typing Proficiency (CCTP) हा नवीन अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. यात इंग्रजी, मराठी व हिंदी भाषांमध्ये 30 किंवा 40 शब्द प्रति मिनिट वेगाने शासकीय मान्यताप्राप्त Remington कीबोर्ड लेआउटवर व्यावसायिक टायपिंग कौशल्य विकसित केले जाते. अंतिम परीक्षा Maharashtra State Board of Technical Education (MSBTE) घेते व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना MSBTE आणि MKCL यांचे संयुक्त शासकीय प्रमाणपत्र प्रदान केले जाते.

हा कोर्स ८वी पास विद्यार्थ्यांपासून पालक, गृहिणी, शिक्षक, नोकरदार, उद्योजक व नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवक-युवतींपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त आहे. AI, डेटा सायन्स व डिजिटल मार्केटिंगसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये करिअरची दमदार सुरुवात करण्यासाठी, स्पर्धा परीक्षांसाठी पूरक म्हणून तसेच स्वयंरोजगाराच्या संधींसाठी हा कोर्स मोलाचा ठरतो.

KLiC व्यावसायिक कोर्सेस — कौशल्यविकासाचा समावेशक मार्ग

भविष्यातील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन MS-CIT सोबतच MKCL तर्फे उद्योगस्नेही, रोजगाराभिमुख आणि कौशल्यविकासावर आधारित विविध कोर्सेस KLiC (Knowledge Lit Career) या ब्रँडअंतर्गत राबविण्यात येत आहेत. सध्या सर्व विद्यार्थ्यांसाठी 265 हून अधिक विविध KLiC कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

KLiC अंतर्गत 30, 60, 90 व 120 तासांच्या कालावधीचे कोर्सेस उपलब्ध आहेत. Back Office, Financial Accounting, Digital Designing, Data Science, IT Hardware, Networking & Cyber Security, Software Development यांसारख्या प्रमुख ट्रॅक्समध्ये टॅली विथ GST, अ‍ॅडव्हान्स्ड एक्सेल, ग्राफिक डिझायनिंग, वेब डिझायनिंग, सायबर सिक्युरिटी व सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग असे अनेक रोजगाराभिमुख कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.

120 तासांचे कोर्सेस पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना MKCL प्रमाणपत्रासोबत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) यांची मान्यताप्राप्त गुणपत्रिका प्रदान केली जाते. तसेच कोणतेही तीन KLiC कोर्सेस पूर्ण केल्यास विद्यार्थ्यांना ‘KLiC डिप्लोमा’ हे अतिरिक्त प्रमाणपत्रही दिले जाते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) कौशल्याधारित व रोजगारक्षम शिक्षणावर भर देत MKCL ने हे कोर्सेस आपल्या अधिकृत प्रशिक्षण केंद्रांमार्फत उपलब्ध करून दिले आहेत.

महाराष्ट्रातील 5,000 हून अधिक अधिकृत MKCL शिक्षण केंद्रांवर सुसज्ज संगणक प्रयोगशाळा व प्रशिक्षित मार्गदर्शकांसह MS-CIT, CCTP तसेच KLiC कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ‘आपण करूया महाराष्ट्र AI रेडी’ या मोहिमेत सहभागी होऊन मोफत AI मास्टरक्लासचा लाभ घ्यावा आणि अधिक माहिती व प्रवेशासाठी आपल्या जवळच्या अधिकृत MKCL प्रशिक्षण केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित, पुणे (MKCL)

या पत्रकार परिषदेस सोनाली कटके, बालकिशन बलदवा, सिद्धार्थ पाटील, गजानन कुलथे, धनंजय जेवळीकर, निलेश झाल्टे मधुकर खिल्लारे यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow