उद्या होणा-या अधिवेशनात होणार आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नावर चर्चा...

उद्या होणा-या अधिवेशनात होणार आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नावर चर्चा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) - सध्या राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण पेटले आहे. निजाम सरकारच्या गॅजेटच्या नोंदीनुसार मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर ओबीसी समाज अक्रामक झाला आहे. ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी पुढे येत आहे. धनगर समाजाला एसटी वर्गात समाविष्ट करण्यात यावे हि जुनी मागणी आहे यासाठी राज्यभर धनगर व बंजारा समाज रस्त्यावर उतरला आहे. मुस्लिम समाज पण मागास आहेत हे शासनाने विविध कमिट्या व आयोगाने अभ्यास करून अहवाल दिला. उच्च न्यायालयाने या समाजाला 5 टक्के आरक्षण देण्यासाठी मान्यता दिली असताना सरकार अंमलबजावणी करत नाही. अशा विविध विषयांवर उद्या सिडको येथील गुलाब विश्व हाॅल येथे होणा-या दलित, ओबीसी, मायनाॅरीटी, आदीवासी (डोमा) च्या राज्यस्तरीय अधिवेशन गहन चर्चा होणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत डोमाचे जिल्हाध्यक्ष प्रा.बादशाह पटेल यांनी दिली आहे.
डोमाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार डॉ.उदीत राज(IRS) यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन होणार आहे.
या अधिवेशनात भारतीय संविधान वाचवून जनसुरक्षा अधिनियम रद्द करणे. ओबीसी प्रवर्गाचे हक्काचे आरक्षण वाचविणे. दलित, मुस्लिम समाजावर होणारे अन्याय थांबवणे. मुस्लिम आरक्षण, वक्फ बोर्डात शासकीय व राजकीय हस्तक्षेप थांबवणे. बुध्द गया येथील महाबोधी बौध्द विहार बौद्ध अनुयायांकडे तात्काळ सोपवावे. शेतकऱ्यांच्या शेती मालास दरडोई उत्पन्नाप्रमाणे एम.एस.पी.लागू करणे. जातीनिहाय जनगणना करणे. भारतीय सर्व निवडणूकांत ईव्हीएम रद्द करणे. अल्पसंख्याक समुदायाकरीता 15 कलमी कार्यक्रम प्रभावीपणे राबवावे या ज्वलंत प्रश्नांवर प्रमुख वक्ते प्रकाश टाकणार आहे.
अधिवेशन सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत असणार आहे. मोठ्या संख्येने जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन बादशहा पटेल यांनी केले आहे.
या अधिवेशनात प्रमुख वक्ते जेष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे, प्रमुख अतिथी डोमाचे प्रदेशाध्यक्ष प्रितम आठवले, राष्ट्रीय सचिव प्रितम कांबळे, राष्ट्रीय सचिव भाई प्रदीप अंभोरे, युवा आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.हर्षवर्धन दवने, तेलंगानाचे प्रदेशाध्यक्ष महेश्वर राज आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
What's Your Reaction?






