गॅस टंचाईच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे जोरदार निदर्शने...!

 0
गॅस टंचाईच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे जोरदार निदर्शने...!

गॅस टंचाईच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे जोरदार निदर्शने...  

नरेंदर कब मिलेगा सिलेंडर घोषणाबाजीने परिसर दणाणला

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज) - शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गॅस टंचाई निर्माण झाली आहे. या गॅस टंचाईच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. नरेंदर कब मिलेगा सिलेंडर अशा जोरदार घोषणाबाजी करून वंचितच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. राज्यामध्ये घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाले आहे. सर्वसामान्यांना घरगुती गॅस मिळत नसल्याने जेवण मिळणे मुश्किल झाले आहे. अकोला येथील वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी उन्हातच रांगेत उभे राहिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात गॅस टंचाईच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली होती त्याचाच एक भाग म्हणून आज शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेश प्रवक्ते तय्यब जफर, जिल्हानिरीक्षक योगेश बन, पश्चिम जिल्हा अध्यक्ष रूपचंद गाडेकर, पश्चिमचे शहराध्यक्ष पंकज बनसोडे, नगरसेविका करुणा जाधव. युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी नरेंदर कब मिलेगा सिलेंडर यासह मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. महिला कार्यकर्त्यांनी आंदोलनास्थळी चूल पेटवून चुलीवर भाकरी थापल्या. निदर्शनानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन सादर केले. गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई थांबवावी गॅस सिलेंडरचा, काळाबाजार रोखावा, गॅस मिळण्यासाठी 25 दिवसाची अट रद्द करावी, काळाबाजार करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी. वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून कम्युनिटी किचन सुरू करावेत. केवायसी न केलेल्या नागरिकांना गॅस सिलेंडर तातडीने देण्यात यावा आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे. यावेळी राज्य प्रवक्ते तय्यब जफर, पश्चिम जिल्हा निरीक्षक योगेश बन, पश्चिम जिल्हाध्यक्ष रूपचंद गाडेकर ,नगरसेविका करुणा जाधव, पश्चिमचे शहराध्यक्ष पंकज बनसोडे, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, महिला जिल्हाध्यक्ष कोमल हिवाळे, वंदना नरवडे, संदीप जाधव, साधना पठारे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भाऊराव गवई, अंजन साळवे, उमेश सरदार, राजन कीर्तने, संघपाल इंगोले, मंगल टेहरे, रवी रत्नपारखे, सचिन गायकवाड, जगन खोतकर, अंकुश जाधव, अरविंद साठे, प्रवीण हिवाळे, आनंद शेजुळ, सोमनाथ महापुरे, अश्विनी मिसाळ, ॲड. पुष्पा घोडके, जया गजभिये, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow