आंतरजिल्हा बदली शिक्षक संघटनेची स्थापना
आंतर जिल्हा बदली शिक्षक संघटनेची स्थापना... औरंगाबाद,दि.16(डि-24 न्यूज) जिल्ह्यामध्ये आंतरजिल्हा बदली करून आलेल्या शिक्षकांची संख्या जवळजवळ दोन हजाराच्या आसपास असून या शिक्षकांचे अनेक प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे जिल्हाभरातील कोणत्या संघटनेने या शिक्षकांच्या मूळ प्रश्नाकडे लक्ष न दिल्यामुळे या शिक्षकांचा आक्रोश बाहेर येऊन या शिक्षकांनी आज 16 डिसेंबर रोजी कॅनॉट गार्डन या ठिकाणी क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या साक्षीने अंतर जिल्हा बदली संघटनेची स्थापना केली या संघटनेच्या व्यासपीठावरून अंतर जिल्हा बदली धारक शिक्षकांचे प्रमुख दोन महत्त्वाची प्रश्न आहे त्यामध्ये आंतर जिल्हा बदली करून आलेल्या शिक्षकांची मूळ सेवा ग्राह्य धरावी, शासन निर्णयाप्रमाणे या शिक्षकांना एक वेतन वाढ मिळावी हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असून कोणत्या संघटनेने दखल घेतली नव्हती म्हणून या रोशामुळे संघटनेची स्थापना आंतरजिल्हा बदली करून आलेल्या शिक्षकांनी केली या संघटनेच्या व्यासपीठावरून हे प्रश्न शासन दरबारी मांडले जातील असे विजय साळकर यांनी सांगितले. या बैठकीमध्ये प्रामुख्याने वरील दोन प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली व संघटनेची रुप रेषा ठरवण्यात आली. यामध्ये प्रत्येक तालुक्याला दोन दोन समन्वयक नेमण्यात आले या समन्वयका मार्फत आंतरजिल्हा बदली धारकांचे आणखीन काही असलेले प्रश्न घेऊन जिल्हा परिषद स्तरावर राज्य शासननाच्या स्तरावर हे प्रश्न मांडले जातील असे साळकर यांनी सांगितले. या बैठकीला नितीन नवले, गजेंद्र बोंबले, प्रदीप मोरे, योगेश सिसोदे, बी. बी. मुंडे, मीनाक्षी राऊत, नितीन पाटील, संजय शेळके, अनिल रगडे, स्मिता तलवारी, मंगलजी बिडकर, तुकाराम सोनवणे, बाबासाहेब नागोराव, राजू तळेकर, सिद्धार्थ वाघ, गट्टूवार एल जी मर्बे, के जी श्रीमती गोरडे, सुजाता भंडारे, एल एल वाघमारे, जे एस पेठे, मनीषा, रूपाली इंगोले, तुरुकमणे एस व्ही यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?