आंबेडकर महाविकास आघाडीत येणार नाही, AIMIM चा विजय होणार नाही- आमदार संजय सिरसाट

 0
आंबेडकर महाविकास आघाडीत येणार नाही, AIMIM चा विजय होणार नाही- आमदार संजय सिरसाट

आंबेडकर महाविकास आघाडीत येणार नाही, AIMIM चा विजय होणार नाही- आमदार संजय सिरसाट

सोमवारी शिंदे गटात मोठे नेते प्रवेश करणार असल्याचा दावा...

औरंगाबाद, दि.15(डि-24 न्यूज) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष एड बाळासाहेब आंबेडकर हे महाविकास आघाडी सोबत जाणार नाही हे घटनाक्रमानुसार समोर येत आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमला एकही जागा महाराष्ट्रात मिळणार नाही. एक मोठा नेता सोमवारी शिंदे गटात प्रवेश करणार त्याच बरोबर चार ठिकाणी विविध नेत्यांचे शिवसेना शिंदे गटात प्रवेश होईल. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचा उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असेल. तीन ते चार जण इच्छुक आहेत. अधिकृत घोषणा काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील. त पत्रकार परिषदेत माहिती देताना प्रवक्ते तथा शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाट यांनी सांगितले विनोद पाटील हे सुद्धा इच्छुक आहेत. पालकमंत्री संदीपान भुमरे हे सुद्धा इच्छुक आहेत असे विचारले असता त्यांनी सांगितले मुख्यमंत्री उमेदवारी घोषित करतील. आम्ही पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. यावेळी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी व शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow