उद्या ओवेसी घेणार आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा...!

उद्या ओवेसी घेणार विधानसभा निवडणुकीचा आढावा...!
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.12(डि-24 न्यूज) राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी एमआयएमचे सुप्रीमो खासदार असदोद्दीन ओवेसी राज्यातील पदाधिकारी यांच्याशी संवाद साधणार आहेत. उद्या शनिवारी दिवसभर हडको काॅर्नर येथील एका हाॅटेलमध्ये एमआयएमचे सुप्रीमो खासदार असदोद्दीन ओवेसी हे राज्यातील काही विधानसभा मतदारसंघातील आढावा पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ओवेसी आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्व तयारीसाठी पदाधिकारी यांची मते जाणून घेणार आहे व लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची समिक्षा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सकाळी 10 वाजेपासून विदर्भ नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम सकाळी 11.30 वाजेपर्यंत.
सकाळी 11.30 वाजेपासून धुळे, जळगाव, मालेगाव, नाशिक, नंदुरबार.
दुपारी 12.20 वाजेपासून
पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.
दुपारी 12.50 वाजेपासून
भिवंडी, मुंब्रा, ठाणे, मुंबई.
दुपारच्या जेवणानंतर मराठवाडा विभागातील दुपारी तीन वाजता औरंगाबाद शहरातील मा.नगरसेवक यांच्याशी स्वतंत्र संवाद साधतील त्यानंतर जिल्ह्यातील पदाधिकारी सोबत चर्चा.
त्यानंतर औरंगाबाद शहरातील युथ, महीला आघाडी, विद्यार्थ्यांशी संवाद.
नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना येथील एमआयएमच्या पदाधिकारी सोबत चर्चा करतील. दुपारी 4.30 हडको काॅर्नर येथील 7 एप्पल हाॅटेल येथे पत्रकार परिषदेला संबोधित करतील.
What's Your Reaction?






