उद्या नगरपरिषदेसाठी मतदान, कामगार-कर्मचा-यांसाठी भरपगारी सुट्टी...

 0
उद्या नगरपरिषदेसाठी मतदान, कामगार-कर्मचा-यांसाठी भरपगारी सुट्टी...

कामगार-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी...

छत्रपती संभाजीनगर, दि.1(डि-24 न्यूज)- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नगर परिषद नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या निवडणूकीचा कार्यक्रम घोषित असून जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये निवडणूका होत आहेत. मंगळवार दि.2 रोजी होणाऱ्या नगर परिषद/ नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 करिता मतदार संघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याबाबत शासन आदेश निर्गमित झाला आहे. त्यानुसार,

1. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.

2. ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिल (उदा. खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.)

3. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.

तसेच सर्व कामगार/अधिकारी / कर्मचारी यांना सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने दि.2 रोजी मतदान करता यावे याबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तातडीने निराकारण करण्यासाठी कामगार अधिकारी सु. प्र. राजपुत (मोबाईल नंबर- 7875397382), सहा. नोडल अधिकारी गो. आ. गावंडे (मोबाईल नंबर- 8275238836), वि. ना. वैद्य दुकाने निरीक्षक (मोबाईल नंबर-9860319354 ),श. मा. राठोड, दुकाने निरीक्षक (मोबाईल नंबर- 8530793244) हे काम पाहणार आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow