उद्या होणा-या महापालिकेच्या आरक्षण सोडतीकडे सर्व राजकीय पक्षांचे लागले लक्ष...
11 नोव्हेंबरला विद्यापीठ सभागृहात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम...मनपाची तयारी पूर्ण
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 10(डि-24 न्यूज) - राज्य निवडणूक आयोगाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या प्रभाग रचनेची तपासणी करून मंजुरी दिली आहे. त्या अनुषंगाने दिनांक 11 नोव्हेंबर, मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सभागृह, छत्रपती संभाजीनगर येथे आरक्षण सोडतीच्या कार्यक्रम संपन्न होणार आहे.
यानिमित्त छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पारदर्शकपणे व चांगल्या प्रकारे पार पाडावे यासाठी महानगरपालिकेचे किमान 125 अधिकारी कर्मचारी यांना विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
या संदर्भात एक कार्यालयीन आदेश देखील काढण्यात आला आहे. सदरील आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांना आरक्षण सोडत कार्यक्रमाचे मुख्य नियंत्रण अधिकारीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे तर मुख्य लेखापरीक्षक शिवाजी नाईकवाडे आणि उपायुक्त तथा निवडणूक विभाग प्रमुख विकास नवाळे यांची सहायक नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त राहणार आहे. याच्यात पंधरा पुरुष पोलीस दहा महिला पोलीस आणि एक पोलीस निरीक्षक तसेच महापालिकेतील नागरी मित्र पथकातील माजी सैनिक यांच्या समावेश राहणार आहे.
याशिवाय कार्यक्रमच्या ठिकाणी एक कॅरडीएक ऍम्ब्युलन्स महानगरपालिका तर्फे ठेवण्यात येणार आहे. याशिवाय सिग्मा हॉस्पिटल आणि जिल्हा शैल्य चिकित्सक यांचे ॲम्बुलन्स डॉक्टरांचे एक युनिट सह राहणार आहे.
सोडत कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण स्थानिक वृत्तवाहिनी आणि सोशल मीडियावर करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रभाग दर्शविणारा नकाशा व परिशिष्ट फलकावर दर्शनी भागात लावण्यात येणार आहे.
What's Your Reaction?