एका लाखांच्या खुर्चीवर कोण बसणार, महापौर पदासाठी 27 जानेवारीपर्यंत पक्षश्रेष्ठी घेईल निर्णय...

 0
एका लाखांच्या खुर्चीवर कोण बसणार, महापौर पदासाठी 27 जानेवारीपर्यंत पक्षश्रेष्ठी घेईल निर्णय...

एक लाखांच्या खुर्चीवर कोण बसणार, महापौर पदासाठी रस्सीखेच, माळवतकर यांच्या गळ्यात माळ पडण्याची शक्यता....?

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज) - छत्रपती संभाजीनगरचे महापौर पद सर्वसाधारण गटासाठी असल्याने महापालिका प्रशासनाने नवीन महापौरांना आसनस्थ करण्यासाठी एक लाखांची खुर्ची आणली आहे. या खुर्चीची विशेषतः हि आहे यावर झोप पण काढण्याची सुविधा आहे. नवीन महापौरांना समोर सर्वात महत्त्वाचा आव्हान म्हणजे पाण्याचा प्रश्न सोडवणे व नवीन डिपी प्लॅनचे रस्ते मोकळे करून अतिक्रमण हटवणे, हाॅकर्स झोन व ट्राफिकची समस्या हे आव्हान असणार आहे. 33 नगरसेवक निवडून आल्याने मजबूत विरोधी पक्ष एमआयएम समोर असताना सत्ता एवढी सोपी नसेल असे राजकीय जाणकारांचे मत आहे. या लाखोंच्या खुर्चीवर कोण बसेल यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे लाॅबिंग सुरू आहे तर रस्सीखेच पण असणार आहे. भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी सांगितले 27 जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. नगरसेवक महेश माळवतकर, समीर राजूरकर, राजगौरव वानखेडे, विजय औताडे, शिवाजी दांडगे, रामेश्वर भादवे, सुरेंद्र कुलकर्णी हे अनुभवी नगरसेवक निवडून आले आहेत यामधून एका नावावर शिक्कामोर्तब होईल. यामधून एक नाव निवडणे जिकीरीचे काम आहे. या निवडणुकीत भाजपाचे 57 नगरसेवक निवडून आले एका नगरसेवकाची सत्ता स्थापनेसाठी गरज भासणार आहे. 

शहराचा 23 वा महापौर कोण होणार याची उत्सुकता लागली आहे. महापौर दालनाचे नुतनीकरण झाले आहे तर महापौरांच्या खुर्चीची किंमत 80 हजार ते एक लाख रुपये आहे. महापौरांच्या दालनाला कार्पोरेट लुक दिला आहे. राज्यातील पहिले आधुनिक सभागृह नगरसेवकांना बसण्यासाठी बनवले आहे. भाजपाला या निवडणुकीत बहुमत मिळाल्याने महापौर व गटनेते पदासाठी हालचाली तीव्र झाले आहे. गटनेता निवडीसाठी बैठक आयोजित केली आहे नाव कार्यकारीणी कडे पाठवली जाणार आहे. अंतिम निर्णय 27 जानेवारीपर्यंत पक्षश्रेष्ठी घेईल अशी शक्यता आहे. अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी दिली आहे.

शहराला पाच वर्षांनंतर मिळणाऱ्या महापौरांकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पाणीपट्टी न वाढवता पिण्याचे मुबलक पाणी मिळावे, डिपी प्लॅनचे रस्त्यांचा श्वास मोकळा करुन भुसंपादन करुन बाधितांना मोबदला देणे, वाहतूक समस्या व हाॅकर्स झोन, गुंठेवारी वस्त्यांचा विकास, सिडको हडकोचा विकास असे आव्हान नवीन महापौरांसमोर असल्याने दमछाक उडणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow