एमआयएमच्या तिकीटावरुन किराडपु-यात राडा, पोलिस बंदोबस्त तैनात, परिसरात शांतता...
एमआयएमच्या तिकीटावरुन किराडपु-यात राडा, पोलिस बंदोबस्त तैनात, परिसरात शांतता...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) - एमआयएमने सोशलमिडीयावर चार उमेदवारांची दुपारी दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर किराडपुरा येथे राडा झाला. प्रभाग 12 मधून सर्वसाधारण जागेतून युवा शहराध्यक्ष मोहम्मद असरार यांना पक्षाने उमेदवारी दिली. याठिकाणी हाजी इसाक खान हे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार होते. असरारला तिकीट मिळाल्याने हाजी इसाक खान यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संताप दिसून आला. उमेदवारी मिळाल्यानंतर असरार हे येथील रहीवाशांना भेटण्यासाठी रैली काढली असता त्यांचा जागोजागी सत्कार करण्यात आला. या गर्दीत हाजी इसाक खान यांच्या समर्थकांनी असरारला धक्काबुक्की करत गळ्यातील हार काढून फेकले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जीन्सी पोलिसांनी सतर्कता दाखवल्याने अनर्थ टळला. यानंतर येथील तणाव निवळला व येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांचा जमाव जीन्सी पोलिस ठाण्यासमोर जमला. याठिकाणी प्रदेश महासचिव समीर साजिद बिल्डर आले त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. हाजी इसाक खान यांनी पक्षासाठी रात्रंदिवस एक केले. प्रत्येक निवडणुकीत येथून एमआयएमला मते मिळवून देत वार्डाच्या विकासासाठी योगदान दिले आणि पक्षाने सक्रीय व निष्ठावंत कार्यकर्त्याचा तिकीट कापल्याचा आरोप यावेळी त्यांच्या समर्थकांनी करत त्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. याप्रसंगी जमाव शांत होत नसतात हाजी इसाक खान यांनी गाडीवर चढून जमावाला शांत केले. वार्डातील नागरीक सोबत आहे. नागरिकांनी शांतता ठेवावी. आपल्याला न्याय मिळेल कायदा हातात घेऊ नका. वार्डातील जनता जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असे त्यांनी जाहीर केल्यानंतर जमाव परत गेला. तक्रार न देता दोन्ही गट परत गेले. आता बघावे लागेल एमआयएमचे वरिष्ठ नेते कार्यकर्त्यांचा राग कमी करण्यासाठी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
12 नंबर प्रभागात कटकट गेट, किराडपुरा शरीफ काॅलनी, रहेमानिया काॅलनीचा काही भाग, बाबर काॅलनी, नाहीद नगर, यशोधरा काॅलनी हा भाग येतो. दोन सर्वसाधारण जागेसाठी एमआयएम पक्षाचे दोन उमेदवार जाहीर झाले आहे आता एक सर्वसाधारण महिला व एक ओबीसी महीला आरक्षित जागेसाठी उमेदवार जाहीर झालेले नाही.
या राड्यानंतर प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलिल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले उमेदवार माझ्याकडे निश्चित होत नाही माझ्याकडे फक्त मुलाखती झाल्या. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅ.असदोद्दीन ओवेसी निर्णय घेतात मी फक्त यादी सोशल मिडियावर जाहीर करत आहे.
What's Your Reaction?