एसडिपियचा उर्दू फलकावरुन रेल्वे स्थानकावर राडा, उर्दू भाषा संपवण्याचा भाजपावर आरोप...
एसडिपिआयचा उर्दू फलकावरुन रेल्वे रोको, भाजपाचा उर्दू भाषा संपवण्याचा डाव - समीर शाह
आमदार संजय केनेकर यांच्यावर केली टिका, त्यांच्या दबावाखाली रेल्वे प्रशासन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर रेल्वे स्थानकाचे नामांतर छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. यानंतर मराठी, इंग्रजी व उर्दू भाषेत फलक लावण्यात आला. परंतु भाजपाचे एक वक्तव्य उर्दू फलक हटवण्यासाठी आल्यानंतर ते हटवल्याने एसडिपिआय (सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया) अक्रामक झाली आहे. उर्दू भाषेत फलक लावण्यात यावे यासाठी रेल्वे प्रशासनाला दहा दिवसांचा वेळ निवेदनात दिला होता परंतु फलक न लावल्याने आज दुपारी एक वाजता रेल्वे रोको आंदोलन करण्यासाठी एसडिपिआयचे जिल्हाध्यक्ष समीर शहा यांच्या नेतृत्वाखाली झेंडे व बॅनर हातात घेऊन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत रेल्वे स्थानकावर दाखल झाले. उर्दू के सन्मान मे एसडिपिआय मैदान में, भाजपा होश मे आवो हाय हाय, संजय केनेकर होश मे आलो, उर्दू मे बोर्ड लगाया जाये अशा घोषणाबाजीने रेल्वे स्थानक दणाणले. यावेळी आंदोलकांना रेल्वे प्रवेशद्वारावर अडवून पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्ते व पोलिसांमध्ये काही काळ झटापट झाली. यामध्ये महीला कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेत वेदांतनगर पोलिस ठाण्यात नेऊन प्रतिबंधित कार्यवाही करुन सोडून देण्यात आले.
जिल्हाध्यक्ष समीर शहा यांनी यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले उर्दू भाषा संपवण्याचा भाजपाचा डाव आहे. हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. स्वातंत्र्य पूर्वी देश इंग्रजांच्या तावडीतून सोडवण्यासाठी उर्दू भाषेतून क्रांती झाली होती. स्वातंत्र्याच्या लढ्यात लाखो मुस्लिमांनी प्राणांची आहुती दिली. उर्दू भाषा फक्त मुस्लिम समाजाची मर्यादित नाही या भाषेचा जन्म भारतात झाला. उर्दू भाषेतील नाव का वगळण्यात आले. रेल्वे प्रशासनावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शहराचे नामांतर झाल्याने रेल्वेने जीआरचे कारण देत उर्दू नाव हटवले. मात्र रेल्वेला हा जीआर लागू होत नाही. 2017 च्या रेल्वे कायद्यानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ज्या भागात विशिष्ट भाषिकांची लोकसंख्या जास्त आहे तिथे त्या भाषेत नाव असणे बंधनकारक आहे. उर्दू हि भाषा केवळ मुस्लिम समाजाची नाही ती हिंदूस्थानी भाषा आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील रेल्वे स्थानकाचे नाव उर्दू भाषेत आहे मग येथील का हटवण्यात आले ते नाव पुन्हा फलकावर लिहावे अशी आमची मागणी आहे जोपर्यंत नाव लिहणार नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष समीर शहा, अब्दुल अलीम, मोहसीन खान, आरेफ शाह, अश्रफ पठाण, जबीन शेख, अबुजर पटेल, रियाज सौदागर, हसीन कौसर, हाफिज समीउल्लाह काजी, फरहान शेख, सोहेल पठाण, सरफराज खान, मोहसीन शेख, मिर्झा शमीम व कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?