काँग्रेसचे एक माजी नगरसेवक एमआयएमच्या वाटेवर...?

 0
काँग्रेसचे एक माजी नगरसेवक एमआयएमच्या वाटेवर...?
काँग्रेसचे एक माजी नगरसेवक एमआयएमच्या वाटेवर...?

काँग्रेसचे माजी नगरसेवक एमआयएमच्या वाटेवर...?

औरंगाबाद, दि.20(डि-24 न्यूज) किराडपूरा वार्डातील काँग्रेसचे माजी नगरसेवक इब्राहिम पटेल नेहमी एमआयएमचे कट्टर विरोधक राहिलेले आहे. त्यांची सुरुवातीपासून काँग्रेस सोबत नाळ जुळलेली आहे. मागील लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षासाठी एकनिष्ठेने काम करुन भरभरून उमेदवारांना मते मिळवून दिली. औरंगाबाद नामांतराचा निर्णय उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना अचानक घेतल्याने त्यांनी काँग्रेसला आपल्या शहर उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून त्यांनी समाजकार्य सुरू ठेवत कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही. एमआयएमची लाट असताना त्यांनी काँग्रेसचा प्रचार करत खंबीरपणे उभे राहिले. त्यांना मागिल महापालिका निवडणुकीत एमआयएमची उमेदवारी देण्याचे ऑफर असताना नाकारले परंतु जसजशी महापालिका निवडणुका जवळ येत असताना इब्राहिम पटेल यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन खासदार इम्तियाज जलिल यांनी सदिच्छा भेट घेतल्याने इच्छुकांच्या भुवाया उंचावले आहे. इब्राहिम पटेल मागिल अनेक वर्षांपासून सक्रीय राजकारणात असल्याने चार पाच वार्डात त्यांचे वर्चस्व असल्याने ते एमआयएमच्या वाटेवर असल्याची चर्चा किराडपूरा परिसरात रंगली आहे. त्यांचे समाजकार्य बघून सर्व राजकीय पक्षांशी संबंध असल्याने नेते भेट घेतात. पवित्र हज यात्रेतून परतल्याने खासदार इम्तियाज जलिल हे संपर्क कार्यालयात भेटायला आले हि सदिच्छा भेट होती. एमआयएम प्रवेशाचा हा भाग नाही. असे इब्राहिम पटेल यांनी डि-24 न्यूजला सांगितले. पण एमआयएमच्या काही नेत्यांची इच्छा आहे त्यांनी पक्षात प्रवेश करावा अशीही चर्चा शहरात आहे. आगामी महापालिका निवडणुकीत इब्राहिम पटेल एमआयएम पक्षात आले तर फायदा होईल असेही नेत्यांना वाटत आहे. बारी काॅलनी वार्डात विकास कामाचे उद्घाटन करण्यासाठी खा.इम्तियाज जलिल आले होते. याप्रसंगी शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, एमआयएमचे नेते नासेर सिद्दीकी, जमीर अहेमद कादरी, हाजी इसाक खान, फेरोज खान, आरेफ हुसेनी, इरशाद खान, रफीक शेख, रफीक पालोदकर, शेख आरेफ, शेख आसेफ उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow