काँग्रेसचे माजी नगरसेवक युनुस पटेल एमआयएमच्या गळाला, मुलगी झिनतला उमेदवारी...

 0
काँग्रेसचे माजी नगरसेवक युनुस पटेल एमआयएमच्या गळाला, मुलगी झिनतला उमेदवारी...

काँग्रेसचे युनुस पटेल एमआयएमच्या गळाला, मुलगी झिनतला उमेदवारी...!

माजिद पठाणची मध्यस्थी, पटेल बिरादरीची हर्सुलमध्ये एकजूट...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज) - उद्या महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस. आदल्या दिवशी राजकारणात नवीन घडामोडी राजकीय पक्षात घडत आहेत. काँग्रेसचे माजी नगरसेवक युनुस पटेल एमआयएमच्या गळाला लागले आहे. हर्सुल परिसरात पटेलांचे मतदान निर्णायक आहे. युनुस पटेल यांची कन्या झिनतला ओबीसी महीला आरक्षित जागेसाठी एमआयएमने उमेदवारी दिल्याने सर्वसाधारण जागेतून एमआयएमचे उमेदवार अजहर पठाण यांचा या निवडणुकीत फायदा होईल अशी चर्चा प्रभाग 1 मध्ये सुरू झाली आहे. एमआयएमचे जुने कार्यकर्ते माजिद पठाण यांनी मध्यस्थी करून प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलिल यांचे मन वळवण्यात यशस्वी झाल्याने पटेल बिरादरी नेहमी एक दुस-याच्या विरोधात निवडणूक लढत असे पण यावेळी एकजूट झाल्याने विरोधी पक्षांसाठी हि धोक्याची घंटा मानली जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow