काँग्रेसच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज) आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटी वतीने नामविस्तार दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉ. अरुण शिरसाठ यांनी केले होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. विद्यापिठाच्या नामविस्तार लढ्यात शहीद हुतात्मांना श्रद्धांजली दिली व त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व महानगरपालिकाचे माजी सभापती ॲड एकबालसिंग गिल, अनिस पटेल, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर नागरे, महिला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष दीक्षा पवार, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अजय दिंडोरे पाटील शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सौ मंजुताई लोखंडे, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय धर्मरक्षक, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष रेखाताई राऊत, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अरुणाताई लांडगे, सोशल मीडियाचे प्रमुख प्रा. शीलवंत गोपनारायण, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे रवी लोखंडे, रऊफ देशमुख, अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मजाज खान, रंजनाताई हिरवाळे, आनंद भाऊ दाभाडे, सय्यद तोफिक सय्यद जाकीर, संजय जाधव, मीनाज शब्बीर पटेल आदी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.
What's Your Reaction?






