गांधी परिवाराला निजामाच्या नातवाचे लग्नाचे निमंत्रण, राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी स्विकारले निमंत्रण

 0
गांधी परिवाराला निजामाच्या नातवाचे लग्नाचे निमंत्रण, राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी स्विकारले निमंत्रण

गांधी परिवाराला निजामाच्या नातवाचे लग्नाचे निमंत्रण...!

गांधी परिवाराने स्विकारले निमंत्रण...

नवी दिल्ली, दि.19(डि-24 न्यूज) 1 ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथे निजामाच्या नातूच्या मुलीचे शाही लग्न सोहळा होणार आहे. नवाब नजम अली खान हे हैदराबाद संस्थानचे शेवटचे राजे निजामाचे नातू आहे. गांधी कुटुंबाशी निजाम सरकारचे जुने संबंध असल्याने खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशीही त्यांचे पारिवारिक संबंध होते.

निजामाचे सातवा कुटुंब नवाब नजफ अली यांनी आपल्या मुलीचे लग्न असल्याने नवी दिल्ली येथे राहुल गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेतली व शाहि निमंत्रण पत्रिका दिली. 1 ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथे होणा-या या शाही लग्नाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशातील विविध पक्षातील प्रमुख नेत्यांना निजाम सरकारच्या नातवाने निमंत्रण दिले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow