गुजरातच्या धर्तीवर सेंट्रल बसस्थानकाचे बस पोर्ट मध्ये रुपांतर करणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 0
गुजरातच्या धर्तीवर सेंट्रल बसस्थानकाचे बस पोर्ट मध्ये रुपांतर करणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

गुजरातच्या धर्तीवर सेंट्रल बसस्थानकाचे बस पोर्ट बनवणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 

तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया राबविणार, पाण्याची बाॅटल 15 रुपयाला स्टाॅलवर मिळते का बघितले.‌..संभाजीनगर-धुळे बसमध्ये चढून प्रवाशांसी सुविधा मिळते का संवाद साधला.‌..पाथरीला बसथांबा असताना बस थांबत नाही एका विद्यार्थ्याने निवेदन दिले त्यावर तात्काळ बस थांबविण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले‌. स्वचालयाची स्वच्छता आहे का तेथे जाऊन त्यांनी पाहणी केली....15 कामगार स्वच्छतेचे काम करतात त्यांच्याशी संवाद साधला.... स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले....

 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज)- 

मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पाहणी करण्यासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक येणार असल्याची माहिती मिळताच अधिकारी व कर्मचारी यांची धावपळ बघायला मिळाली. कॅन्टीनची पाहणी करु नये यासाठी आज बंद ठेवण्यात आली. पार्सल रुमलाही कुलुप होते‌. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असलेला परिसर व स्वच्छता गृहाची साफसफाई करताना धावपळ करताना कामगार दिसत होते. सायंकाळी सात वाजता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे बसस्थानकावर आगमन झाले यावेळी त्यांनी परिसराची पाहणी केली यानंतर माध्यमांशी संवाद साधला. शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिकतेची नवी दिशा देण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकाचे लवकरच अत्याधुनिक बसपोर्टमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पुढील 3 महिन्यांत निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

यावेळी ते म्हणाले की, सन 1978 मध्ये उभारण्यात आलेले सध्याचे बसस्थानक कालांतराने अत्यंत जीर्ण झाले आहे. प्रवाशांना आधुनिक आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या बसस्थानकाचा सर्वांगीण विकास करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती. या मागणीची दखल घेत बसस्थानकाच्या पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला आहे.

गुजरातमधील अत्याधुनिक बसपोर्टच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगरमध्येही आधुनिक बसपोर्ट उभारण्यात येणार आहे. या बसपोर्टमध्ये प्रवाशांना आरामदायी प्रतीक्षागृह, स्वच्छतागृहे, सुसज्ज फलाट आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि सोयीस्कर होण्यास मदत होईल. सिडको बसस्थानक बनवण्यासाठी कायदेशीर अडचणी येत आहेत. विमानतळ जवळ असल्याने इमारत बांधण्यासाठी अडचणी येत आहे ती सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याचे महत्त्वाचे केंद्र असून, येथील बसस्थानकाचा विकास शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी उभारी देणारा ठरेल. आधुनिक बसपोर्टच्या उभारणीमुळे एसटीच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण होण्यासोबतच प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडणार आहे.

1100 नवीन बस खरेदी केली सध्या ईव्ही बस चालवण्यावर जास्त भर दिला जात आहे. यामुळे इंधनाची बचत होणार आहे. अत्याधुनिक बस रस्त्यावर उतरवून दर्जेदार सुविधा प्रवाशांना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आदीवासी परिसरात मीनी बस चालवली जात आहे. एसटी कामगारांना बोनस लवकरच जाहीर केला जाईल. 1 तारखेलाच सर्व कर्मचाऱ्यांना वेतन अदा केले आहे. ईव्ही रिक्षा व ऑनलाईन मोटारसायकल प्रवासी वाहतूकीला परवानगी नाही. अशी प्रवासी वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाई केली जाईल. खाजगी ट्राव्हल्स जास्त प्रमाणात दिवाळीच्या निमित्ताने भाडे आकारणी करत असतील तर त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री यांनी दिले. याप्रसंगी विभागीय नियंत्रक प्रमोद नेहुल व अधिकारी उ

पस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow