डिसिपि नवनीत कावत यांची धडाकेबाज कारवाई, जुगार अड्ड्यावर छापा
डिसिपि नवनीत कावत यांची धडाकेबाज कारवाई, जूगार अड्ड्यावर छापा
औरंगाबाद, दि.13(डि-24 न्यूज) कटकट गेट परिसरातील शरीफ काॅलनी येथे अवैध जुगार अड्ड्यावर डिसिपि नवनीत कावत यांनी आता छापा मारल्याने खळबळ उडाली.
सायंकाळी साडेसात वाजेपासून हि कार्यवाही सुरू होती.
कार्यवाही झाल्यानंतर डिसिपि नवनीत कावत यांनी डि-24 न्यूजला माहिती दिली की गुप्त माहिती मिळाल्यानंतर या जुगार अड्ड्यावर छापा टाकला असून झन्नामन्ना जूव्वा खेळताना 8 जणांना ताब्यात घेतले. आरेफ उर्फ बब्बू याच्या घरात हा अवैध जुगार अड्डा सुरू होता. या कार्यवाहीत साडेतीन लाख रुपये रोख रक्कम, दहा ते बारा मोबाईल, जुगार खेळण्याचे साहित्य, पथकाने जप्त केले आहे. रात्री हि कार्यवाही झाल्याने बघ्यांची गर्दी कटकट गेट चौकात जमा झाली होती. येथे काही काळ ट्राफीक जाम झाले होते. डिसिपि नवनीत कावत यांच्यासह पथकात झोन 2 चे सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निता बागवडे, पिएसआय हरिष खटावकर, पि.एस.जाधव, एपिआय दिलिप चंदन, ASI गजेंद्र शिंगणे, हेकाॅ शोन पवार, पोशि राजेश चव्हाण, महीला हेकाॅ हाके यांनी हि कार्यवाही केली आहे.
What's Your Reaction?