नवीन वर्षात ऐतिहासिक आमखास मैदानावर IJ FEST-2 चा थरार, खेळाडूंसाठी नवीन पर्वनी

 0
नवीन वर्षात ऐतिहासिक आमखास मैदानावर IJ FEST-2 चा थरार, खेळाडूंसाठी नवीन पर्वनी

नवीन वर्षात ऐतिहासिक आमखास मैदानावर IJ FEST-2 चा थरार

औरंगाबाद, दि.20(डि-24 न्यूज) नविन वर्षात ऐतिहासिक आमखास मैदानावर दुवा बँक फाऊंडेशनच्या वतीने IJ FEST-2 चा थरार बघायला मिळणार आहे. क्रिकेटमध्ये खासदार चषक, फुटबॉल व मुशायरा(कवी संमेलन) व फुड फेस्टिवलची मेजवानी शहरवासीयांसाठी असणार आहे. क्रिकेट टुर्नामेंट 2 जानेवारी ते 11 जानेवारी 2024, त्यानंतर फुटबॉल टुर्नामेंट, 14 जानेवारी रोजी सायंकाळी मुशायरा, फुड फेस्टिवल मध्ये हैदराबाद येथील बिर्याणी व हलिमची चव चाखायला मिळणार आहे. यावेळी टॅगलाईन आहे "मेरा शहर मेरा गुरुर"

काही दिवसांपूर्वी शहराचे वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याने खेळाच्या माध्यमातून एकता व भाईचाराचे संदेश देण्यात येणार आहे. देशासाठी इंडियाच्या क्रिकेट टीममध्ये खेळण्यासाठी संधी मिळाली पाहिजे हा उद्देशाने उदयोन्मुख खेळाडू तयार झाले पाहिजे या उद्देशाने हा फेस्टिवल खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. आज क्रिकेट टीमच्या खेळाडूंचा ऑक्शन आयोजित करण्यात आला आहे यामध्ये दहा टीमचे मालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विजेता टीमला 8 लाख बक्षीस व कफ, दुसरे बक्षिस 6 लाख व कप मिळणार आहे. कुस्तीच्या मुकाबल्यासाठी प्रयत्न केले जात आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत बिलाल इम्तियाज जलील यांनी दिली आहे. त्यांनी शहरवासीयांना आवाहन केले आहे क्रिकेट व फुटबॉलचे चाहते, फुडफेस्टिव्हलचा कुटुंबासहीत आनंद घ्यावा.

 या पत्रकार परिषदेत क्रिकेट टुर्नामेंटचे मार्गदर्शक शेख हबीब, फुड फेस्टिवलचे सय्यद आबेद अली यांची उपस्थिती होती.

दहा क्रिकेट टीमची नावे

Hi teh Infra Strikers

Al-RG International

Empire Estate

Baba Builders

Manjeet Pride World

Patel King woriors

Icon Hospital Strikers

Kalim Quraishi Cricket Club

Guddu Emi-21

AM Popular Builders

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow