नशेच्या आहारी गेलेल्या दुचाकी चोरा कडून 12 दुचाकी जप्त, बेगमपुरा पोलिसांची कामगिरी

 0
नशेच्या आहारी गेलेल्या दुचाकी चोरा कडून 12 दुचाकी जप्त, बेगमपुरा पोलिसांची कामगिरी

नशेत पेट्रोल संपले की चोरीची गाडी पार्किंग मध्ये सोडून पसार, दुचाकीचोराकडून 12 दुचाकी जप्त...‌!

बेगमपुरा पोलिसांची कारवाई, डिसिपि नितीन बगाटे यांची माहिती, दुचाकी कुख्यात चोरावर विविध पोलिस ठाण्यात 19 गुन्हे दाखल 

औरंगाबाद, दि.19(डि-24 न्यूज) चोरीची दुचाकी पेट्रोल संपेपर्यंत चालवायची नंतर एखाद्या पार्कींग मध्ये सोडून पसार व्हायचे नंतर बनावट चाबीने आणखी दुचाकी चोरी कडून चालवायची अशा 12 दुचाकी या चोरा कडून जप्त करण्यात बेगमपुरा पोलिसांना यश आले आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत डिसिपि नितीन बगाटे यांनी दिली आहे.

या दुचाकी चोराचे नाव आहे अंबर उर्फ बाळू विठ्ठल देवकर, वय 26, राहणार फरशीफाटा, तालुका फुलंब्री, नशेमध्ये हा दुचाकी चोरी करत असे. त्याला घाटी रुग्णालयाच्या पार्कींग मधून मोटारसायकलला चावी लावून संशयित रित्या हॅण्डल लाॅक उघडण्याचा प्रयत्न करत शिताफीने ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन विचारले असता गांजाच्या नशेत मौजमजेसाठी पोलिस स्टेशन बेगमपुरा, एमआयडीसी वाळूज, सातारा, वेदांतनगर, एमआयडीसी सिडको, खुलताबाद, फुलंब्री भागातून दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आतापर्यंत विविध पोलिस ठाण्यात 19 गुन्हे दाखल आहेत. 12 दुचाकी पोलिसांनी जप्त केले आहे. यामध्ये जास्त दुचाकी होंडा शाईन कंपनीचे आहे. एकूण 6 लाख 30 हजार रुपयांचे दुचाकी हस्तगत केली आहे. अशी माहिती बगाटे यांनी दिली आहे. नागरीकांनी आपल्या दुचाकी चांगले प्रकारचे लाॅक लाऊन चोरी होणार नाही याची स्वतः काळजी घ्यावी. असे आवाहन केले आहे.

जप्त केलेल्या होंडा शाईन ,दुचाकी क्रमांक MH-20, DX-4057, रंग काळा, वेदांतनगर पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या MH-20,BR-2840, बेगमपुरा, होंडा शाईन ,MH-20,CP-2126, पोलिस ठाणे एमआयडीसी वाळूज MH-20, DL-5275, एमआयडीसी वाळूज, बजाज प्लॅटीना क्रं.MH-20, ER-4472, 

सातारा पोलीस ठाणे, हिरो पॅशन, MH-20, DP-0050, बेगमपुरा पोलिस स्टेशन, हिरो होंडा, MH-20, BP-1982, M-सिडको होंडा शाईन, दुचाकी क्रमांक MH-20, BZ-1186, खुलताबाद हद्दीतील CD डिलक्स, मो.सा.क्रं. MH-20,AU-2406, M-सिडको हद्दीतील MH-20,CF-0552, बेगमपुरा हद्दीतील बजाज प्लॅटीना MH-20,FR-4472, पोलिस ठाणे बेगमपुरा एच एफ डिलक्स, MH-20,EH-1171 या मोटारसायकल बेगमपुरा पोलिसांनी जप्त केले आहे.

सदर कारवाई पोलिस आयुक्त मनोज लोहिया, पोलिस उपायुक्त परिमंडळ -2 नितीन बगाटे, सहायक पोलिस आयुक्त शहर विभाग महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मंगेश जगताप, पोउपनि विनोद भालेराव, पोह मिना पातोडे, शिवाजी कचरे, पोशि गणेश गायकवाड, शरद नजन, ज्ञानेश्वर ठाकूर, चालक पोशि उमेश ठाकूर, गणेश हवाले यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow