निसर्गाची जपणूक करुन फोटोग्राफी करायला हवी- कर्नल समीर राऊत

 0
निसर्गाची जपणूक करुन फोटोग्राफी करायला हवी- कर्नल समीर राऊत
निसर्गाची जपणूक करुन फोटोग्राफी करायला हवी- कर्नल समीर राऊत

निसर्गाची जपणूक करून फोटोग्राफी करायला हवी- कर्नल समीर राऊत

- जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन

- एमजीम विद्यापीठ, कलर्स ऑफ संभाजीनगर आणि यशवंतराव चव्हाण सेंटरचा उपक्रम

औरंगाबाद, दि.20(डि-24 न्यूज) यशवंतराव सेंटर मुंबई विभागीय कार्यालय आणि एमजीएम विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कलर्स ऑफ संभाजीनगर ह्या हौशी फोटोग्राफर समूहातर्फे 19 ऑगस्ट या जागतिक छायाचित्रण दिवसाचे औचित्य साधून आयोजित फोटोग्राफी प्रदर्शनाचे उदघाटन कर्नल (नि.) समीर राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. निसर्गाची जपणूक करून फोटोग्राफी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

वन्यजीव, निसर्ग, उत्सव, वारसास्थळे, पोर्ट्रेट आणि लोकसंस्कृती ह्या विषयांवरील छायाचित्रांचे हे प्रदर्शन कला दीर्घ आर्ट गॅलरी, एमजीएम क्रीडा संकुल येथे भरवण्यात आले आहे. दोन दिवसीय अश्या या प्रदर्शनाला तरुण मंडळींनी उदंड प्रतिसाद दिला असून सोमवारीही सकाळी 10 ते सायंकाळी 8 दरम्यान खुले राहणार आहे.  

शहरातील 60 व शहराबाहेरील 20 हौशी फोटोग्राफर लोकांचे 100+ फोटो रसिकांना बघण्यास मिळणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन करताना कर्नल (नि.) समीर राऊत म्हणाले, 'फोटोग्राफी करताना निसर्ग, पाणी, झाडे, पाने, फुले आदींची मनापासून काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. सोमवारी (ता. 21) रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी छायाचित्रकार बैजू पाटील, एमजीएम फिल्म विभागाचे प्रमुख शिव कदम, यशवंतराव चव्हाण सेंटरचे सुहास तेंडुलकर आणि कलर्स ऑफ छत्रपती संभाजीनगरचे सदस्य उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow