पैठणचे दत्ता गोर्डे शिवसेनेत अजित पवारांना धक्का तर प्रसिद्ध डॉक्टर शोएब हाश्मींच्या प्रवेशाने लोकसभेचे गणित बिघडणार...!

 0
पैठणचे दत्ता गोर्डे शिवसेनेत अजित पवारांना धक्का तर प्रसिद्ध डॉक्टर शोएब हाश्मींच्या प्रवेशाने लोकसभेचे गणित बिघडणार...!

दत्ता गोर्डेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश...

अजित पवार गटाला पैठणमध्ये धक्का...

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेची ताकत वाढली... राजकीय गणिते बिघडणार...

मुंबई, दि.6(डि-24 न्यूज) पैठण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दत्ता गोर्डे, वैजापूर येथील वैद्यकीय व्यवसायिक डॉ. राजू डोंगरे औरंगाबाद शहरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व एशियन हॉस्पिटलचे संचालक डॉ. शोएब हाश्मी यांनी आज मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधून शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पूर्वाश्रमीचे दत्ता गोर्डे यांनी घरवापसी केल्यामुळे अजित पवार गटाला पैठण मध्ये मोठा धक्का बसला आहे. 

    शिवसेनेचे आक्रमक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख संपूर्ण तालुक्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यापूर्वी ते शिवसेनेतच होते. गोर्डे यांच्यासोबत 

सुरेश दुबाळे माजी सभापती, वि.आर.थोटे प्राध्यापक, माजी उपाध्यक्ष आपासाहेब गायकवाड, प्रवीण शिंदे आदी जणांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख राजू राठोड, माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकटगावकर , उपजिल्हाप्रमुख संजय निकम ,अविनाश पाटील गलांडे, अशोक शिंदे, तालुकाप्रमुख मनोज पेरे, अंकुश रंधे ,अनंत भालेकर, बद्री नारायण भुमरे, शुभम पिवळ उपस्थित होते.

दत्ता गोर्डे हे मूळचे शिवसेनेचे कार्यकर्ते. त्यांनी 2019 साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक ही लढवली. 13 हजारच्या मताधिक्याने त्यांचा पराभव झाला. तरीही 69 हजार 924 मतदान घेऊन ते दुसर्‍या क्रमांकाचे उमदेवार ठरले होते.

गोर्डे यांनी मागील पंधरा वर्षांत नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्षपर्यंतचा राजकीय प्रवास केला आहे. मध्यंतरी ते भाजपमध्येही होते. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर ते काही दिवस अजित पवार यांच्या गटातही होते. ते आक्रमक आणि जनतेच्या संपर्कातील कार्यकर्ते

आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow