मंदीरातील दागिन्यांची चोरी करणाऱ्या पाच आरोपिंना अटक... गुन्हे शाखेची जलदगती कार्यवाई...

 0
मंदीरातील दागिन्यांची चोरी करणाऱ्या पाच आरोपिंना अटक... गुन्हे शाखेची जलदगती कार्यवाई...

हनुमान मंदिरातील दागिन्यांची चोरी करणाऱ्या पाच आरोपींना अटक

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी हद्दीत असलेल्या कर्णपुरा मैदानाजवळील हनुमान मंदिरातील दानपेटी व मूर्तीवरील दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा छावणी पोलीसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला 2 लाख 82 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक 24 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास हनुमान मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून तसेच हनुमान मूर्तीवरील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. या घटनेमुळे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या होत्या. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस आयुक्त श्री. प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त श्री. रत्नाकर नवले व सहायक पोलीस आयुक्त श्री. अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. अवघ्या 15 तासांत पोलिसांनी पाचही आरोपींना अटक करून गुन्ह्याचा छडा लावला.

 अटक करण्यात आलेले आरोपी :

अजमद खान सलीम खान (वय 28), राहणार जलाल काॅलनी, छत्रपती संभाजीनगर,

शेख शौएब शेख बाबा (वय 30), राहणार अल हिलाल काॅलनी, 

शेख समीर शेख सलीम (वय 23), कटकट गेट 

शेख आमेर शेख नब्बू (वय 29), रोजाबाग हडको काॅर्नर,

इमरान खान उर्फ इम्मा पिता युनूस खान (वय 22), कटकट गेट, बाबर काॅलनी 

(सर्व रा. छत्रपती संभाजीनगर)

आरोपींकडून चोरीस गेलेली रोख रक्कम, चांदीचे डोळे तसेच गुन्ह्यात वापरलेली दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय याच आरोपींकडून दाखल असलेल्या इतर चोरीच्या गुन्ह्यांचाही उलगडा झाला आहे.

ही कारवाई छावणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली आहे.

सदरील कार्यवाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, गजानन कल्याणकर, पोलिस उपनिरीक्षक जगन्नाथ मेंदकुदळे, संदीप काळे, पोह कैलास काकड, संदीप तायडे, संजय मुळे, सुनील जाधव, सुनील पाटील, शोनपवार , पोअं दिपक शिंदे, मनोज विखनकर, बाळू नागरे, प्रमोद सुरासे, विजय घुगे, धनंजय सानप, तुषार सपकाळ, रोहित जाधव, दिनकर आवारे, अरुण भिसे, सागर शेंडे, शाहरुख शेख, मपोअं प्रिती इलग, वनिता तुपे, मनिषा नरोडे गुन्हे शाखेच्या वतीने केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow