मनपाच्या वतीने प्री फॅब्रिकेटेड कंटेनर अभ्यासिकेचे पालकमंत्र्यांनी केले उदघाटन
प्री फॅब्रिकेटेड कंटेनर अभ्यासिकेचे उद्घाटन...
मनपा च्या शाळा सर्व सोयिसुविधा युक्त करणार-
पालकमंत्री
औरंगाबाद, दि.27(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी शाळेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका अंतर्गत प्री फॅब्रिकेटेड कंटेनर अभ्यासिकेचे उद्घाटन पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी करण्यात आले.
याप्रसंगी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील व सौरभ जोशी ,जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, शहरअभियंता ए .बी देशमुख ,उपायुक्त नंदा गायकवाड , मुख्याध्यापक संजीव सोनार हे उपस्थित होते.
. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये 36 ई अभ्यासिका साठी 10 कोटी रुपये निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध झाला असून आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्फत कार्यान्वित करण्यात येत आहे. ,यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री यांनी महानगरपालिकेच्या शाळा या सर्व सोयसुविधा युक्त करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच आणखी अभ्यासिका वाढविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे ही ते म्हणाले.
पालकमंत्री संदीपान भूमरे ,जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय व मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने हा ड्रीम प्रोजेक्ट आहे.
यावेळी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेचे उद्घाटन देखील तीन रंगाचे फुगे अवकाशात सोडून करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्य व कवायत सादर करून पाहुण्यांचे मने जिंकली पालकमंत्री यांनी शालेय परिसर शालेय इमारत व शाळेमध्ये काढण्यात आलेले चित्रांचे प्रशंसा केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन तेजस्विनी देसले तर आभार प्रदर्शन संजीव सोनार यांनी केले.
What's Your Reaction?