मनपाच्या समन्वयाने टेक महिंद्रा फाउंडेशन देणार गरीब तरुणांना दर्जेदार प्रशिक्षण
मनपाच्या समन्वयाने टेक महिंद्रा फाउंडेशन देणार गरीब तरुणांना दर्जेदार प्रशिक्षण
* 250 तरुणांना एका वर्षात विविध हॉस्पिटल संबंधित अभ्यासक्रम उपलब्ध होणार
* प्रशिक्षणानंतर रोजगाराची चांगली संधी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज) शहरातील गोर गरीब तरुणांसाठी एक आनंदाची बाब म्हणजेच नावाजलेल्या टेक महिंद्रा फाऊंडेशन मनपा व सिकंदर अली वज्द मैमोरियल ट्रस्ट यांच्या समन्वयाने अत्यंत अल्पशा दरात हॉस्पिटल संबंधित विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देणार आहे. यासाठी सोमवारी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयात समन्वय करार करण्यात आला.
मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या पुढाकाराने शहरातील तरुणांना रोजगारच्या संधी उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहे. उच्च शिक्षण घेण्याची ज्या तरूणांना संधी मिळाली नसेल त्यांच्या साठी काहीतरी भवितव्य करता येईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, टेक महिंद्रा फाउंडेशन, पुणे व सिकंदर अली वज्द मैमोरियल ट्रस्ट यांमध्ये एक त्रिपक्षिय करार करण्यात आले ज्यात टेक महिंद्रा फाउंडेशन कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणार आहे. सिकंदर अली वज्द मैमोरियल ट्रस्ट निश्चित कालावधीसाठी जागा उपलब्ध करुन देणार आहे व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका समन्वयाचे काम करणार आहे.
या करारावर सही करताना मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत सोबत अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, शहर अभियंता ए बी देशमुख, उपायुक्त अंकुश पांढरे, एन यू एल एम विभागाचे भरत मोरे, टेक महिंद्रा फाऊंडेशनच्या प्रकल्प व्यवस्थापक जया लुहाना, सहायक व्यवस्थापक राजकुमार कदम, सिकंदर अली वज्द मैमोरियल ट्रस्ट चे सचिव एम ए पठाण, खजिनदार गोउस मोहिउद्दीन व स्मार्ट सिटीच्या अर्पिता शरद उपस्थित होत्या. हा करार घडवून अण्यामध्ये सिकंदर अली वज्द मैमोरियल ट्रस्ट चे अध्यक्ष सतीश त्रिपाठीची महत्त्वाची भूमिका होती.
टेक महिंद्रा फाउंडेशन, पुणे यांच्यामार्फत स्मार्ट अकॅडमी फॉर हेल्थकेअर (समर्थ) प्रकल्पांतर्गत सामान्य पृष्ठभूमीतून येणाऱ्या तरुणांना कमी दरात महत्वाचे अभ्यासक्रम उपलब्ध होतील व त्यानंतर रोजगारच्या चांगल्या संधीही प्राप्त होणार.
यामध्ये जनरल ड्यूटी असिस्टंट, प्लेबोटॉमी टेक्निशियन, हॉस्पिटल फ्रंट ऑफिस आणि बिलिंग एक्झिक्युटिव्ह कोर्सेसचा समावेश आहे. या कोर्सेस ची कालावधी 6 महिने आहे व यासाठी पात्रता 8 वी पास ते पदवीधर असेल.
टेक महिंद्रा फाउंडेशनचे एका वर्षात 250 तरुणांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट आहे. 70 टक्के महिला व मुलींना यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. विशेष म्हणजे भारतात विविध ठिकाणी टेक महिंद्रा फाउंडेशनच्या प्रशिक्षण केंद्रातून 75 टक्के प्लेसमेंटचा रेकॉर्ड आहे. सिकंदर अली वज्द मैमोरियल ट्रस्टच्या टाउन हॉल येथील इमारतीत हे अभ्यासक्रम चालवले जातील.
जी श्रीकांत, आयुक्त तथा प्रशासक छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
“छत्रपती संभाजीनगर शहरात असलेल्या तरुणांना विशेषकरुन मुली व महिलांना नावाजलेल्या टेक महिंद्रा फाउंडेशन मार्फत दर्जेदार प्रशिक्षण व त्यानंतर सन्मानाच्या रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याचा दृष्टीने आज करार करण्यात आले. याद्वारे शहरातील दवाखान्यांना कुशल कर्मचारी मिळतील व आरोग्य सेवा सशक्त होईल.”
What's Your Reaction?